आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune University Reevaluation Result Declared On 3 O' Clock At Early Morning

पुणे विद्यापीठाने पहाटे तीनला दिले फेरतपासणीचे निकाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पुणे विद्यापीठाच्या वतीने फेरतपासणीचे निकाल जाहीर करताना विलंब तर झालाच; मात्र मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या विषयांचे निकालही मंगळवारी पहाटे 3 वाजता विद्यापीठाने जाहीर केले. अपवादात्मक निकालातच बदल झाला. मात्र, विद्यार्थ्यांना त्याची माहिती सकाळी परीक्षेला जातानाच मिळाल्याने त्याचा विशेष फायदा झाला नसल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

वार्षिक परीक्षा सुरू झाल्यानंतरही विद्यापीठाने फेरतपासणीचे निकाल जाहीरच केले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यातच विद्यापीठाने मंगळवारी होणार्‍या विषयांचे मागील फेरतपासणीचे निकाल जाहीर करण्याचे आश्वासन देत पहाटे 3 वाजता ते संकेतस्थळावर जाहीर केले. त्यात विधी शाखेचे राज्यशास्त्र-2, फॅमिली लॉ-1 , जनरल इंग्लिश-2, लीगल लँग्वेज, सिव्हिल प्रोसिजर कोड (सीपीसी) या विषयांचे निकाल जाहीर केले.

मात्र, त्यात विशेष बदल झाले नसून, संपूर्ण विद्यापीठात सीपीसी या विषयांचे केवळ चारच विद्यार्थ्यांचे फेरतपासणीत पास झाल्याने त्याबाबत विद्यार्थी संघटनेने संशय व्यक्त केला. मनविसेने कुलगुरूंची भेट घेत निकाल तत्काळ जाहीर करण्याची मागणी केली. या वेळी प्रदेशाध्यक्ष खंडू जगताप, शिक्षण मंडळ सदस्य जय कोतवाल, शहर उपाध्यक्ष अजिंक्य गिते, संजय देवरे, गणेश वाळके, कौशल पाटील उपस्थित होते.
उर्वरित निकाल 30 एप्रिलपर्यंत
विविध शाखांचे प्रलंबित असलेले निकाल 30 एप्रिलपर्यंत जाहीर केले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सांगण्यात आले. त्यात विधी शाखेचे उर्वरित निकाल 20 एप्रिलपर्यंत, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे 24 एप्रिल आणि अभियांत्रिकीचे 30 एप्रिलपर्यंत जाहीर केले जातील.

फेरतपासणीचा कोटा 5 टक्क्यांचाच राबवावा
फेरतपासणीच्या निकालात विशेष बदल झालेला नाही. त्यात 10 टक्के गुणांची कोटा पद्धत राबविली जात असून, पूर्वी ती 5 टक्के होती. तीच पद्धती पुन्हा राबवावी. अजिंक्य गिते, शहर उपाध्यक्ष, मनविसे