आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठाचे सुविधा केंद्र नाशिकमध्ये महिनाभरात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- डुप्लिकेट गुणपत्रक काढायचं आहे. ट्रान्सस्क्रिप्टसाठी कागदपत्रांची पडताळणी करावयाची आहे, पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा आहे, तर आता पुणे विद्यापीठात जाण्याची अथवा ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तो पोस्टाने पाठविण्याची गरज नाही. कारण महिनाभरातच विद्यापीठाचे नाशकातील विद्यार्थी सुविधा केंद्र कार्यरत होणार असून, या समस्यांचे निराकरणही तेथेच होणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील विभागीय कार्यालयातच ते सुरू होणार आहे. सेतू कार्यालयाप्रमाणेच सार्‍या सुविधा उपलब्ध असतील. केलेल्या अर्जांची पावतीही विद्यार्थ्यांना दिली जाईल. जेणेकरून आतापर्यंत मॅन्युअली अर्ज भरण्याच्या पध्दतीने अनेकदा विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत होता. शिवाय त्यात वेळही अधिक जात होता. त्याच्या वाढत्या तक्रारी ध्यानात घेत विद्यापीठाने पुण्यातच विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करत ऑनलाइन अर्जांचीही व्यवस्था केली; मात्र ऑनलाइन अर्ज केल्यानंतरही त्याची प्रिंट पुन्हा विद्यापीठाकडे पाठवावी लागते. अनेकदा ते वेळेत पोहचतच नाही. शिवाय पोहचल्यानंतरही अनेक दिवस प्रमाणपत्र मिळतच नाही. त्यामुळे विद्यापीठातच जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. आता मात्र येथेच अर्ज जमा केल्यानंतर केंद्रामार्फतच ते विद्यापीठात पाठविले जातील आणि दहा दिवसांच्या आत कुठलेही प्रमाणपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल, असे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या वतीने सांगण्यात आले.
बैठकीत सविस्तर चर्चा
विद्यापीठाच्या बैठकीत विद्यार्थी सुविधा केंद्र त्वरित सुरू करण्यासाठी चर्चा झाली. या केंद्रासाठी 25 लाख रुपयांचा निधीही वितरित केला आहे. या केंद्राची उभारणी वेगाने सुरू आहे.
-डॉ. व्ही. बी. गायकवाड
उपकरणे बसविण्याची प्रक्रिया केंद्रात सुरू
विद्यार्थी सुविधा केंद्रास आवश्यक असलेली विविध उपकरणे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठाकडून त्यास निधीही मिळाला आहे. तांत्रिक समितीच्या मान्यतेनंतर आणि संगणकासह इतरही सुविधांची चाचणी घेऊन विद्यापीठाचे कुलगुरूंच्या हस्ते त्याचे महिनाभरात उद्घाटन केले जाणार आहे. या केंद्रामुळे नाशिक परिसरातील डॉ. ए. सी. श्रीवास्तव, केंद्र समन्वयक, उपविभागीय कार्यालय, नाशिक