Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Punjab Mail Engine Engine Fail

पंजाब मेलचे इंजिन फेल, दुपारनंतर मध्य रेल्वे सुरळीत

प्रतिनिधी | Oct 12, 2017, 09:06 AM IST

  • पंजाब मेलचे इंजिन फेल, दुपारनंतर मध्य रेल्वे सुरळीत
नाशिकरोड, इगतपुरी-मध्य रेल्वेच्या कसारा आणि उंबरवेल या रेल्वेस्थानकांदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या पंजाब मेलचे इंजिन सकाळी वाजेच्या सुमारास फेल झाले. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी अाणि गोदावरी एक्स्प्रेस या गाड्यांना एक ते सव्वा तास विलंब झाला. इगतपुरी रेल्वेस्थानकामध्ये पंचवटी एक्स्प्रेस एक तास थांबविण्यात आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. यामुळे सुमारे दीड तास ठप्प झालेली मध्य रेल्वेची वाहतूक दुपारनंतर बहुतांश पूर्वपदावर अाली. गतमहिन्यामध्ये दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरल्याची घटना घडली होती. त्यावेळी तीन दिवस रुळ दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने गाड्या बंद ठेवल्या होत्या. त्यानंतरही प्रवासी एक्स्प्रेस अाणि मालगाड्यांच्या इंजिनांमध्ये बिघाड हाेण्याचे प्रकार वारंवार घडू लागल्यामुळे रेल्वे प्रशासनाबद्दल प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी अाहे.

बुधवारीही पंचवटीच्या अाधी नाशिकरोड स्थानकातून सुटलेल्या पंजाब मेलने कसारा स्थानक सोडताच इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे पाठोपाठ अालेल्या पंचवटी एक्स्प्रेसला इगतपुरी रेल्वे स्थानकामध्ये एक ते सव्वा तास हिरव्या सिग्नलची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर गोदावरी, राज्यराणी, दुरांतो एक्स्प्रेस याही उशिरा धावत होत्या.

या गाड्यांना झाला विलंब
- पंचवटी- सव्वा तास;
- एर्नाकुलम, भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, राज्यराणी - एक ते दीड तास.

Next Article

Recommended