आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Purchesing Prices Of Four Years 'golden' Opportunity

चार वर्षांपूर्वीच्या भावात खरेदीची ‘सुवर्ण’संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सलगहाेत असलेल्या दरातील घसरगुंडीमुळे चार वर्षांपूर्वीच्या भावात साेने खरेदीची ‘सुवर्ण’ संधी मात्र ग्राहकांना उपलब्ध झाली अाहे. चार वर्षांपूर्वी अाॅगस्ट २०११ ला शहरात साेन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमकरिता २५,३०० रुपये हाेता, त्याच भावात गुरुवार, २३ जुलै २०१५ ला नाशिककरांना ही सुवर्ण खरेदीची संधी मिळाली. चीनकडून काही प्रमाणात झालेली साेन्याची विक्री अाणि दिवाळखाेरीचा सामना करत असलेल्या ग्रीसकडून साेन्याचा साठा बाजारात उतरविला जाणार असल्याने हे भाव अाणखी घसरण्याची शक्यताही व्यक्त केली जात असली तरी टप्प्याटप्प्याने साेने खरेदीची संधी साधण्याचा पर्याय ग्राहकांसमाेर अाहे.
साेन्याच्या भावात सातत्याने हाेत असलेल्या घसरणीचा विषय दागिन्यांची हाैस असलेल्या घराघरातील गृहिणींपासून गुंतवणुकीचा पर्याय म्हणून साेन्याकडे बघणाऱ्यांनाही अाकर्षित करताे अाहे. बुधवारी (दि. २२) शहरात साेन्याचे दर २४,९५० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली अाले हाेते. त्यात थाेडीशी सुधारणा हाेत गुरुवारी हे दर २५,३०० च्या अासपास पाहायला मिळाले.

अांतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे साेन्याचे दर घसरत असून, चीनकडून काही प्रमाणात साेने विक्रीला काढले गेले अाहे, तर दुसरीकडे दिवाळखाेरीचा सामना करत असलेल्या ग्रीसकडून साेन्याचा साठा बाजारात विक्रीसाठी अाणला जाणार अाहे, यामुळे हे दर सातत्याने घसरत असून, भविष्यातील साैद्ये करारांकडे पाहता ते २३००० ते २३,५०० रुपयांपर्यंत उतरतील, असा अंदाज गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत अाहेत.

टप्प्याटप्प्याने करा खरेदी
भावखाली अाले असले तरी त्यात अजून घसरणीची दाट शक्यता अाहे. २३ हजारांच्या अासपास दर पाेहाेचतील. त्यामुळे टप्प्याटप्प्याने खरेदी करावी. लग्नकार्य अाहेत, त्यांनी अशी खरेदी करावी. -मुकेश चाेथाणी, गुंतवणूक सल्लागार

साेने खरेदीची नामी संधी
चारवर्षांपूर्वी इतके दर कमी झालेले असून, ग्राहकांना कमी दरात साेने खरेदीची नामी संधी चालून अाली अाहे. गुरुवारी बुधवारपेक्षा थाेडासा भाव वाढून ताे २५,३०० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या अासपास हाेता. - नीलेशबाफना, बाफना ज्वेलर्स प्रा.लि.

भविष्यकाळासाठी अाताच खरेदीची संधी
नेहमीमंदीतच खरेदीदारांनी संधी शाेधली पाहिजे, असे बाजाराचे तत्त्व सांगते. चार वर्षांपूर्वीच्या भावात अाज साेने खरेदीची संधी चालून अाली असून, ज्यांच्याकडे लग्नकार्य वा दागिन्यांची हाैस म्हणून साेने खरेदी करण्यास हा भाव उत्तम असल्याचे सराफांचे म्हणणे अाहे.
घसरगुंडी