आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटावविरुद्ध पुराेहित संघाचे उपाेषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-रामकुंडपरिसरातील पुराेहित संघाची काेठी जूनमध्ये हटवल्यानंतर साेमवारी (दि‍. ६) सकाळी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अाणखी काही कथित अतिक्रमण काढले. ही कारवाई अन्यायकारक अवमानजनक आहे असा अाराेप करीत पुराेहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल पदाधिकाऱ्यांनी बेमुदत उपाेषण छेडले. सायंकाळी पालिका अायुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासून न्याय मिळवून देण्याचे अाश्वासन दिल्यानंतर अांदाेलन मागे घेण्यात आले.
भाविकांना सावलीसाठी लावलेले मेणकापड िपंपळपाराला प्रदक्षिणा घालण्यासाठीचा पार ताेडून पुराेहित संघावर गेल्या कैक शतकात झालेला अन्याय केल्याची कैफियत शुक्ल अन्य पदाधिकाऱ्यांनी अामदार बाळासाहेब सानप यांच्यासमाेर मांडली. अगदी परकीय शासकांच्या काळातही पुराेहित संघाच्या कामकाजात इतका हस्तक्षेप झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. हा अन्याय दूर हाेईपर्यंत उपाेषण मागे घेण्याचा िनर्धार त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालून न्याय देण्याचे अाश्वासन दिले असले तरी तशी कार्यवाही झालेली नाही. पुराेहित संघाला डावलून कुंभमेळा पार पाडण्याचा प्रशासनाचा विचार असेल तर ते शक्य नाही, असा इशाराही शुक्ल यांनी दिला. अामदार सानप भाजपचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय साने यांनी सामाेपचाराने मार्ग काढण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्याचे अाश्वासन दिले. यावेळी चंद्रशेखर पंचाक्षरी, अमित गायधनी, हेमंत तळाजिया, अॅड. भानुदास शाैचे, शेखर शुक्ल, अालाेक गायधनी, शेखर गायधनी, नितीन पाराशरे, संताेष पंचभय्ये, प्रशांत चंद्रात्रे, नितीन देव, अाकाश क्षेमकल्याणी, हरीश अंबेकर, प्रतीक शुक्ल, कल्पेश दीक्षित अादींसह पुराेहित संघाचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

जूनमध्ये हटवले कार्यालय
१६जूनला गंगा-गाेदावरी पुराेहित संघाचे रामकुंडावरील छाेटेसे कार्यालय अतिक्रमण निर्मूलन पथकाने पुराेहितांचा विराेध डावलून हटवले हाेते. त्यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पालकमंत्र्यांकडे दाद मागितल्यानंतर पालकमंत्र्यांनी लवकरच मार्ग काढण्याचे अाश्वासन दिले हाेते. त्यानंतर साेमवारी त्याच जागेवर बांधण्यात अालेले मेणकापड हटवताना पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचा अाक्षेप पदाधिकाऱ्यांनी घेतला.

प्रशासनापुढे मांडले गाऱ्हाणे
गंगा-गाेदावरीपंचकाेठी पुराेहित संघाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी महादेव मंदिर जागेच्या व्यवस्थापनाबाबतच्या अधिकारांची जुनी कागदपत्रे विभागीय अायुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका अायुक्तांपुढे सादर केली. प्रशासनाच्या वतीने कागदपत्रांचा अभ्यास करून निर्णय देण्याचे अाश्वासन देण्यात अाले.

पुराेहित गावगुंड नव्हेत...
अतिक्रमणविराेधीपथकाने केलेल्या कारवाईत पाेलिसांच्या माेठ्या फाैजफाट्यासह बळाचा वापर करण्यात अाला. पुराेहित जणू गावगुंड किंवा जमिनी बळकावणारे माफिया असल्यासारखी वागणूक देण्यात अाली. पुराेहित संघावर अशा प्रकारचा अन्याय काेणाच्याच राज्यात झाला नव्हता. ताे या राज्यात हाेत असल्याने सर्व पुराेहितांच्या मनाला अतिव यातना हाेत अाहेत. - सतीश शुक्ल, अध्यक्ष,गंगा-गाेदावरी पंचकाेठी पुराेहित संघ