आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोट्यधीश’ चिखलीकर, वाघ यांची सुटका मात्र टांगती तलवार कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व शाखा अभियंता जगदीश वाघ यांना न्यायालयाने प्रत्येकी 50 लाखांचा जामीन मंजूर केल्यानंतरही चार दिवसांनी सोमवारी रात्री त्यांची कारागृहातून सुटका झाली. सोमवारी रात्री सुटका होताच मंगळवारी सकाळी दोघेही न्यायालय आदेशानुसार ‘एसीबी’ कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले.

सोळा दिवस कारागृहात मुक्काम ठोकलेल्या चिखलीकर व वाघ यांना शुक्रवारी जामीन मंजूर झाला होता. मात्र, दोघांनाही 50 लाखांचे जामीनदार मिळत नसल्याने व त्याच्या प्रक्रियेसाठी तीन दिवस गेल्याने त्यांनी सोमवारी रात्री उशिरा सुटका झाली. जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने पहिले आठ दिवस ‘एसीबी’समोर दररोज हजेरीचे आदेश त्यांना दिले आहेत.

टांगती तलवार कायम
चिखलीकर व वाघ यांच्यासह पत्नीविरोधातही बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीनही फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे हजेरीच्या काळात या दोघांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.