आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅड‘मिशन\' : पहिली कट ऑफ लिस्ट ९० टक्क्यांवर शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दहावी परीक्षेचा सर्वाधिक निकाल लागल्याने अकरावी प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी यंदा ९० टक्क्यांच्या पुढेच राहण्याची शक्यता आहे. मागील चार वर्षांत नाशिकच्या निकालात तब्बल १५ टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. गुणवत्तेबरोबरच उत्तीर्णतेचे प्रमाण वाढल्याने अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ९० ते ९२ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोमवारी ( िद. १५) अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू होत असून, शहरातील प्रमुख महाविद्यालयांत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया होणार आहे. दहावीच्या परीक्षेत ९२ ते ९७ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने, अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीचा कट ऑफही त्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे. त्यात सायन्स आणि कॉमर्स शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याने या दोन शाखांची गुणवत्ता यादी ९३ ते ९५ टक्के राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही शाखांच्या जागा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कसरत करावी लागणार आहे.
इंजिनिअरिंगची प्रवेशप्रक्रिया सुरू
अभियांत्रिकी पदवीच्या प्रथम वर्षासाठी एआरसी सेंटरवरून १८ जूनपर्यंत अर्ज करता येतील. २० जूनपर्यंत कागदपत्र पडताळणी होईल. कॅप राउंडसाठी २१ जूनला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होईल. अर्जातील दुरुस्ती २२ ते २४ जूनपर्यंत, २५ जूनला जागा वाटप यादी घोषणा, २६ जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, त्यानंतर कॅप राउंड १, याप्रमाणे प्रवेशप्रक्रिया होईल.
पॉलिटेक्निक देखील १५ हजार जागा
शहरात अकरावीच्या विविध शाखा असलेली ५१ महाविद्यालये असून, २० हजार ८६० जागा आहेत. तर, अभियांत्रिकीच्या १५ हजारांहून अधिक जागा आहेत. तसेच, आयटीआयमध्येही प्रवेशासाठी संधी अाहे. अकरावीसाठी प्रवेश अर्ज वितरण जमा करणे १८ जूनपर्यंत होईल. तर संवर्गनिहाय गुणवत्ता यादी, प्रतीक्षा यादी २२ जूनला जाहीर होणार असून, त्यानंतर २५ पर्यंत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
गुणवत्ता यादी वाढणार
- दहावीतील उत्तीर्णतेचा टक्का वाढला असून, बहुसंख्य विद्यार्थ्यांची टक्केवारी ९० च्या पुढे अाहे. त्यामुळे पहिल्या यादीचा कट ऑफही वाढेल. विज्ञान शाखेकडे सर्वांचा कल असल्याने या शाखेची पहिली दुसरी गुणवत्ता यादी जास्तच राहील.
बी. जी. वाघ, प्राचार्य, सिडको कॉलेज