आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत पन्नू व दर्शन दुबे यांनी पूर्ण केली ‘रेस अराउंड ऑस्ट्रिया’, ही शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेस अाॅस्ट्रिया पूर्ण करणारे सायकलपटू दर्शन दुबे अाणि भारत पन्नू. - Divya Marathi
रेस अाॅस्ट्रिया पूर्ण करणारे सायकलपटू दर्शन दुबे अाणि भारत पन्नू.
नाशिक - नाशिकच्या सायकलिस्टनी जगभरातील सायकलिंग स्पर्धा जिंकण्याचा जणू धडाकाच लावला असून लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी रेस अराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड अशी स्पर्धा पूर्ण केली. जगप्रसिद्ध अाल्प्स पर्वत रांगांतून जाणारी ‘रेस अराउंड ऑस्ट्रिया’ ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय बनले अाहेत. विशेष म्हणजे ही २२०० किलाेमीटरची स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ११७ तासांची वेळ असताना या दाेघांनी हे अंतर केवळ १०० तासांत पूर्ण केले. 
 
लेफ्टनंट कर्नल पन्नू नाशिक आर्टिलरीच्या स्पेस सेंटरमध्ये एरोनॉटिकल इंजिनीअर असून ते रॅन्डोनर सायकलिस्ट आहेत. तर सुपर रॅन्डोनर सायकलिस्ट असलेले दुबे नाेकरीनिमित्ताने बाहेरगावी राहत असले तरी मूळचे नाशिकचे रहिवासी अाहेत. ‘टीम इंस्पायर इंडिया’चे प्रतिनिधीत्व करणारे दर्शन अाणि भारत यांनी जगभरातील सर्वोत्तम अल्ट्रा सायकलिस्ट्सशी स्पर्धा करत २२०० किलाेमीटरची शर्यत पूर्ण केली आहे. केवळ अाठ महिन्यांच्या प्रशिक्षण आणि सरावाच्या बळावर या जोडीने हे यश मिळवले आहे. 
 
सहा महिन्यांच्या अत्यंत कमी कालावधीत चैतन्य वेल्हाळ यांनी या टीम इन्स्पायर इंडियाला प्रशिक्षण देण्याचे आव्हान स्वीकारले होते. वेल्हाळ हे सर्वात वेगवान भारतीय अल्ट्रा-सायकलस्वार पहिले प्रमाणित आयर्नमॅन प्रशिक्षक आहेत. स्पर्धेसाठी आवश्यक असलेला सर्व प्रकारचा सराव त्यांनी दाेघांकडून करून घेतला हाेता. काही दिवसापूर्वीच लष्करातील नाशिकस्थित कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ, तसेच टीम सह्याद्री सायकलिस्टने जगातील सर्वाधिक कठीण अशी रॅम म्हणजेच रेस अॅक्राॅस अमेरिका ही स्पर्धा पूर्ण केली हाेती. 
 
अशी आहे रेस रेसअराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड आणि आव्हानात्मक स्पर्धा आहे. ऑस्ट्रियाच्या सीमेजवळून जाणाऱ्या अाल्प्स पर्वतराजीतील रस्त्यांनी ही स्पर्धा पूर्ण करावयाची असते. समुद्रसपाटीपासून १७,५०० फूट चढ उतार असलेला हा रस्ता असून ग्रॉस ग्लॉकनेरसारख्या उंच ठिकाणांचाही त्यात समावेश आहे. या स्पर्धेसाठी निर्धारित रस्ता कोणत्याही वाहनांसाठी बंद नसताे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आव्हानात्मक बनते. ही स्पर्धा पूर्ण करणारा स्पर्धक रॅम स्पर्धेसाठी पात्र ठरतो. 
बातम्या आणखी आहेत...