आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखे पाटील यांचा आरोप- मोदींचे \'नमक’ खाताच उद्धव ठाकरेंचा कर्जमाफीला \'जय महाराष्ट्र\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकरी सावंत कुटुंबियांचे सांत्वन करताना विराेधी पक्षातील नेते. - Divya Marathi
शेतकरी सावंत कुटुंबियांचे सांत्वन करताना विराेधी पक्षातील नेते.
मालेगाव - मुंबईत शिवसेनेचा महापाैर झाला अन् शिवसेना अामदारांचे खिशातील राजीनामे कचऱ्याच्या टाेपलीत गेले. पंतप्रधान नरेंद्र माेदींवर टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नंतर माेदींच्या मांडीला मांडी लावून जेवले. ‘माेदींचे नमक’ खाताच कर्जमाफीची मागणीही ते विसरले, असा अाराेप विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी साेमवारी केला. संघर्ष यात्रेनिमित्त अायाेजित सभेत ते बाेलत हाेते.   
 
विखे म्हणाले, ‘कर्जामुळे शेतकरी अात्महत्या वाढत असताना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खाेत काेठे गेले?  कर्जमाफीवर मुख्यमंत्री केवळ ‘विचार करताे. उत्तर प्रदेश माॅडेलचा अभ्यास करू,’ एवढीच उत्तरे देत अाहेत. मात्र, अाम्हाला उत्तर प्रदेश माॅडेल मान्य नाही. सरकट कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा सातबारा काेरा झाला पाहिजे. निवडणुकीपूर्वी दिलेली अाश्वासने भाजप नेते विसरले अाहेत. या सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय नाही.
 
तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण म्हणाले, ‘राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र सरकारची संवेदनशीलता संपली आहे.

आई वडिलांकडे लग्नासाठी पैसे नसल्याने उपवर मुली आत्महत्या करू लागल्या आहेत. कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नसल्याने राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे पण सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. मात्र हा संघर्ष कर्जमाफी मिळेपर्यंत थांबणार नाही.’ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘यापूर्वी शेतकरी कधी संपावर गेला हाेता का? युती सरकारच्या काळात शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी संपावर जाताे अाहे. उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफी केली. परंतु फडणवीस सरकार फक्त विचार करत अाहे. अाम्ही मात्र अाता कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबणार नाही. शेतकरी घराबाहेर पडला तर शासनाला कर्जमाफी करावीच लागेल.’
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, संघर्ष यात्रेच्याच सभेत शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...