आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या राेजगार फळ्याला लंडन युनिव्हर्सिटीचे अामंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘राेजगाराचा हक्क तुमचा अन् माहिती प्रशिक्षण अामचे’ हे ब्रीदवाक्य घेऊन शाळाबाह्य वंचित बेराेजगार युवकांसाठी ‘राेजगार फळा’ हा उपक्रम नाशिकमध्ये अायअारडीएल फाउंडेशनने २०१२ मध्ये सुरू केला अाहे. लाेकसहभाग लाेकवर्गणीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या संकल्पनेतून अातापर्यंत ७१४ युवकांना राेजगार मिळाला असून, अल्प खर्चात सामाजिक-अार्थिक बदल घडवून अाणणाऱ्या नाशिकच्या या राेजगार फळ्याला अाता थेट लंडन युनिव्हर्सिटीचे अामंत्रण अाले अाहे. येथे ही संकल्पना ‘सार्क’ देशांच्या प्रतिनिधींसमाेर मांडली जाणार अाहे.
असा काम करताे फळा
विविध संस्थांच्या मदतीने राेजगार फळा चाैकात लावला जाताे, त्यावर दैनंदिन उपलब्ध स्थानिक अास्थापनांतील नाेकऱ्या वेतन यांची माहिती अपडेट केली जाते. यातूनच बेराेजगारांना या अास्थापनांकडे नाेकरी उपलब्ध असल्याचे कळते ते नाेकरीसाठी तेथे पाेहाेचतात. नाेकरी उपलब्ध असलेल्या अास्थापना अाणि नाेकरीची गरज असलेले युवक यांच्यातील दुवा म्हणून हा फळा माध्यम ठरताे.