नाशिक - आदर्श घोटाळ्याचा अहवाल फेटाळण्याच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची कानउघडणी करण्यापेक्षा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारच बरखास्त करण्याची हिमंत दाखवावी, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.
नाशिक येथे पदाधिका-यांच्या बैठकीनंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आदर्श अहवाल फेटाळण्यास केवळ मुख्यमंत्री जबाबदार नाही. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यापेक्षा सरकारच बरखास्त करावे लागेल. आदर्श अहवाल फेटाळून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मिस्टर क्लीन या प्रतिमेला छेद दिल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांची मोठी कसरतच असून पंतप्रधान, मुख्यमंत्री अशाच सर्वांवर नाराजी व्यक्त करण्याची वेळ येत असल्याची बाब दुर्दैवी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.