आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलाॅन मांजा विकणाऱ्यांवर छापा, २३ हजार रुपयांचा माल जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्या पाच विक्रेत्यांवर छापे टाकून पाेलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले अाहेत. दरम्यान, गुरुवारी टाकलेल्या छाप्यात या व्यावसायिकांकडील मांजा इलेक्ट्रिकल मशीन जप्त करण्यात अाले.

पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांच्या अादेशानुसार परिमंडळ एकच्या पाेलिस उपायुक्त एन. अंबिका, सहायक अायुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक मृदुला नाईक, उपनिरीक्षक हनुमंत वारे अादींच्या पथकाने भद्रकाली परिसरात तीन ठिकाणी छापे टाकलेे.

या छापासत्रात दूधबाजार परिसरातील शहानवाज काइट सेंटर, महाराष्ट्र काइट सेंटर या दुकानांवर तसेच फ्रूट मार्केट येथील अमरज्याेत विधी भांडार, इकबाल हॉटेल पाठीमागील घरात मांजा विक्री करणारा अमित आरोटे, चौकमंडई येथील बॉम्बे पतंग या दुकानांवर छापे टाकून त्यांच्याजवळील मांजा मशीन असा २३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात अाला. या प्रकरणी शहानवाज शेख, रोशन दिलीप कलंत्री, आसिफ इकबाल अन्सारी, कादीरखान गुलाबखान पठाण अमित अरुण अाराेेटे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत.

कारवाई सुरूच राहणार..
दोन दिवसांपासून भद्रकाली परिसरात कडक मोहीम राबवून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी २३ हजारांचा माल जप्त करण्यात आला असून, पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. मधुकर कड, वरिष्ठनिरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे