आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशकात अवैध व्यवसायांवर छापे, सहा तास कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जुन्या नाशकातील भद्रकाली व्हिडिआे हॉल परिसरात पोलिस उपआयुक्त एन. अंबिका यांनी बुधवारी दोन ठिकाणी अचानक छापा टाकून १० किलो गांजा, तर ९९ किलो भांग असे लाखाे रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. सकाळी वाजेपासून सुरू झालेली ही कारवाई तब्बल सहा तास चालली. या कारवाईत चाैघांना अटक करण्यात आली असून, दोन जण फरार अाहेत.
भद्रकाली परिसरातील शेलारवाडा व्हिडिआे हॉल परिसरातील अवैध धंद्यांवर एन. अंबिका यांनी साध्या वेशात दुचाकीवरून येत अचानक कारवाई सुरू केली. या परिसरात गांजा, चरस, भांग अशा अमली पदार्थांची विक्री हाेत असल्याची माहिती अंबिका यांना मिळाली होती. शेलारवाडी येथील एका घरावर छापा टाकण्यात अाला. या छाप्यात घरातून दहा किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी विजय गांगुर्डे, गणपत शहारे, अजय महातो यांना अटक करण्यात आली.

तपास सुरू
^भद्रकाली पोलिसठाण्याच्या हद्दीतील शेलारवाडा व्हिडिआे गल्लीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून अमली पदार्थ जप्त केले. येथून अमली पदार्थ कुठे पुरवला जातो, याचा तपास सुरू आहे. - राजू भुजबळ, सहायकपोलिस आयुक्त

जुन्या नाशकात पाेलिस उपअायुक्त एन. अंबिका यांनी अवैध व्यवसायांवर छापे टाकले. समवेत पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन. दुसऱ्या छायािचत्रात अमली पदार्थ तयार करण्याचे साहित्य.
अशी झाली कारवाई

{१०किलो गांजा, ९९ किलो भांग जप्त
{३ लाखांचा गांजा, भांग अमली पदार्थ जप्त
{चार जणांना अटक, दाेन जण फरार
{ सहा तास चालली कारवाई