आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rail Derailment At Igatpuri Railway Station. Latest News

मालगाडी घसरली; नाशिक-मुंबई मार्ग मोकळा, लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुंबईहून भुसावळकडे जाणार्‍या एका मालगाडीचे तीन डबे इगतपुरी रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरले. यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत. मालगाडीचे डबे रुळावरुन हटवण्यात यश आले असून नाशिकहून मुंबईकडे येणारी वाहतूक सुरळीत झाल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, भुसावळच्या दिशेने जाणारी वाहतूक हळुहळू पूर्वपदावर येईल, अशीही माहिती मिळाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, इगतपुरी रेल्वेस्थानकाजवळ सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. इगतपुरीहून मदतीसाठी रेल्वेचे पथक रवाना झाले आहे. मात्र, मार्ग सुरळीत होण्यास किती वेळ लागेल, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

प्रवाशांचे हाल...
या अपघातामुळे मुंबईहून दिल्लीकडे जाणारी आणि मुंबईहून नागपूरकडे जाणारीही रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. याचबरोबर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

एका आठवड्यात दुसर्‍यांदा घसरली मालगाडी...
इगतपुरी रेल्वे स्टेशनजवळ एका आठवड्यात दुसर्‍यांदा मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. 29 जून रोजी मालगाडीचे सहा डबे इगतपुरी लाेकाे शेडजवळ असलेल्या राम मंदिरासमोर रूळावरून घसरले होते. त्यातीन दाेन डबे चाकासह जमिनीत शिरले. एक डबा बाजूला असलेल्या पोलवर आदळला होता. यामुळे मुंबईकडून येणाऱ्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. सात गाड्या नियाेजित वेळेपेक्षा उशिराने धावत हाेत्या.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो..