आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानकावरील सुरक्षेवरून रेल्वे यंंत्रणेत मतभेद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिकराेड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मवरील सुरक्षाव्यवस्थेच्या नियाेजनावरून रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेत मतभेद निर्माण झाले अाहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रवाशांना अडवण्यासाठी प्लॅटफार्मवर बॅरिकेट‌्स दाेरखंड लावण्यास सुरक्षा यंत्रणेने तीव्र विराेध दर्शविला अाहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून नाशिकला येणाऱ्या भाविकांच्या साेयीसाठी १२ स्पेशल आणि आठ लांब पल्ल्याच्या गाड्या साेडण्यात येणार अाहेत. या गाड्या नवीन चाैथ्या प्लॅटफार्मवर थांबतील. प्लॅटफार्म एकवरून गाड्या परतीचा प्रवास करणार अाहेत. सिंहस्थात स्नान करून परतणाऱ्या भाविकांना थेट रेल्वे स्थानकाएेवजी मालधक्क्यावर प्रवेश देऊन तेथून टप्प्याटप्प्याने स्थानकावर साेडले जाईल. त्यावेळी गाडीत चढण्यासाठी भाविकांनी धावपळ करू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्मवर बॅरिकेट्स आणि दाेरखंडाने प्रवासी अडवण्याचा प्रस्ताव ठेवण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सुरक्षा यंत्रणेवर असताना त्यांना प्रस्तावाबाबत साधे विश्वासातदेखील घेतले नाही. या प्रस्तावाला एकतर्फी मान्यता दिल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना नंतर देण्यात अाली.

प्रवाशांना अडवण्याची ही पद्धत सुरक्षा यंत्रणांना पटलेली नाही, यामुळे धावपळीत दाेरात पाय अडकून प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते, बॅरिकेट्समुळे प्रवासी एकमेकांवर पडण्याचीही शक्यता अाहे. त्यामुळे या प्रस्तावाला सुरक्षा यंत्रणेने तीव्र विराेध केला अाहे. सुरक्षेची जबाबदारी यंत्रणेवर असताना त्यांना त्यांच्या पद्धतीने नियाेजन करण्याची मुभा द्यावी. रेल्वेला प्रवासी अडवायचे असतील तर प्लॅटफार्मवर अडवण्यापेक्षा स्थानकाबाहेरच ते अडवण्याची व्यवस्था करावी. तुमचा पटणारा शक्य नसलेला प्रस्ताव अंमलात अाणायचा असेल अाणि दुर्दैवाने एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सुरक्षा यंत्रणेवर राहणार नाही, असा स्पष्ट इशारा सुरक्षा यंत्रणेने दिला. या मुद्द्यावरून दाेन्ही यंत्रणांतील मतभेद उघड झाले अाहेत.

लाेहमार्ग पाेलिस दुर्लक्षित
सिंहस्थातविकासकामे तसेच पाेलिस इतर विभागांना राज्य शासनाने माेठा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, या सर्व गडबडीत प्रशासनाला रेल्वे स्थानकावरील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या लाेहमार्ग पाेलिस ठाण्याचा साफ विसर पडला. कुंभमेळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना लाेहमार्ग पाेलिस दलाला जिल्हा प्रशासनासमाेर हात जाेडावे लागत अाहे. सिंहस्थात रेल्वे स्थानकावर लाेहमार्गचे इतर जिल्ह्यांतून सुमारे पाचशे अतिरिक्त पाेलिस येणार अाहेत. त्यांच्या राहण्याची, जेवणाच्या व्यवस्थेसाठी लाेहमार्ग पाेलिसांना निधीची गरज अाहे.
बातम्या आणखी आहेत...