आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Fourth Platform Pedestrian Bridge Safe Travel

चाैथा प्लॅटफाॅर्म, पादचारी पुलामुळे सुरक्षित प्रवास, प्रवाशांची गर्दी विभागली गेली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड: रेल्वेने गाजावाजा करता केलेले सिंहस्थ नियाेजन अफलातून यशस्वी झाले. नाशिकराेड स्थानकावर अल्पावधीत उभारलेला ६१० मीटर लांबीचा १२ मीटर रुंदीचा चाैथा प्लॅटफाॅर्म अाणि ५४ मीटर लांबीच्या पादचारी पुलामुळे पर्वणीसाठी देशभरातून अालेल्या लाखाे भाविकांचा प्रवास सुरक्षित झाला.
कुंभमेळ्यात देशभरातील लाखाे भाविकांनी रेल्वे प्रवासाला पसंती दिली. अलाहाबाद कुंभमेळ्यादरम्यान रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या नियाेजनाला सुरुवात झाली. विभागीय, जिल्हास्तरीय बैठकीत प्रशासनाला रेल्वेच्या नियाेजनाच्या पुरेशा माहितीअभावी रेल्वेवर चाैफेर टीका, अाराेप-प्रत्याराेप झाले.
रेल्वेचे नियोजन |स्थानकावर धक्काबुक्की, चेंगराचेंगरीच्या घटना टळल्या
प्लॅटफाॅर्म उभारणीचा रेल्वेचा उद्देश सफल झाला. सुरुवातीला नवीन प्लॅटफाॅर्मचा पहिल्या पर्वणीला सिंहस्थ स्पेशल मुंबईकडील, तर एकवरून भुसावळकडे जाणाऱ्या गाड्या साेडल्या. दुसऱ्या पर्वणीला लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन नियाेजनात बदल केला गेला. मुंबईकडे जाणाऱ्या ६३ नियाेजित ट्रेन, सिंहस्थ स्पेशल गाड्या चारवरून साेडल्याने स्थानकावरील एकाचवेळी गाडी पकडण्यासाठी अालेल्या प्रवाशांचे विभाजन झाले. पहिल्या प्लॅटफाॅर्मवरून भुसावळकडील स्पेशल, दाेन तीनवरून नियाेजित गाड्या साेडल्याने काेणत्याच प्लॅटफाॅर्मवर ताण पडला नाही. पादचारी पूल चाैथा प्लॅटफाॅर्मच सुरक्षित प्रवासासाठी फायदेशीर ठरला. अर्थात यास लाेहमार्ग, रेल्वे सुरक्षा दल, तिकीट तपासणीसांची भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण ठरली.

विचारपूर्वकनियाेजन
अलाहाबादच्याघटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नाशिकराेड स्थानकावर नाशिकराेडकडून सिन्नर फाटा बाजू््कडे एक ते चार प्लॅटफाॅर्मला जाेडणारा ५४ मीटर लांब, ४.८८ मीटर रुंदीचा पादचारी पूल तसेच ६१० मीटर लांबीचा, १२ मीटर रुंदीचा चाैथा प्लॅटफाॅर्म, भुसावळ बाजूकडे ५६ मीटर लंाब, १२ मीटर रुंद शेड, तसेच मुंबई बाजूकडे ३६ मीटर लांब १२ मीटर रुंद शेडची वेळेत उभारणी करून रेल्वेने सर्वांना सुखद धक्का दिला. नाशिकच्या तिन्ही पर्वण्यांना सिंहस्थ स्पेशल, लांब पल्ल्याच्या तसेच नियाेजित गाड्यांनी महिनाभरात लाखाे भाविक नाशिकराेडला अाले. भाविकांच्या गर्दीमुळे काेलमडले जाणारे नियाेजन पादचारी पुलामुळे टळले. प्रवाशांना जुन्या नवीन पुलावरून एक ते चार प्लॅटफाॅर्मवर साेडल्याने धक्काबुक्की, चेंगराचेंगरीच्या घटना टळल्या.

स्थानकावर रेल्वे पाेलिस सुरक्षा दलाचे जवान तैनात असल्याने प्रवाशांची सुरक्षा अबाधित राहिली.
रेल्वेस्थानकात प्रवेशद्वारावर करण्यात अालेले बॅरिकेडिंग पाेलिस बंदाेबस्त यामुळे प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवता अाले.