आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी कुंभमेळ्याची: उभारला विकासाचा प्लॅटफाॅर्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - नाशिक त्र्यंबकेश्वर येथे भरणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकराेड रेल्वे स्थानकावर चाैथा प्लॅटफाॅर्म पादचारी पुलाच्या उभारणीला प्रारंभ झाला आहे. युद्धपातळीवर सुरू असलेल्या या प्लॅटफाॅर्मची लांबी ६१० मीटर असून, पादचारी पुलाची लांबी सुमारे ५५ मीटर आहे.

नाशिकराेड स्थानकावर जागा, मुबलक पाणी वीज उपलब्ध असल्याने प्रवासी टर्मिनस उभारण्याच्या प्रवाशांच्या काही वर्षांपासूनच्या मागणीला रेल्वेने वारंवार बिकट आर्थिक परिस्थितीचे कारण देऊन केराची टाेपली दाखविली होती. मात्र, आॅगस्ट महिन्यात भरणा-या कुंभमेळ्यात रेल्वेने देशभरातून नाशिकला लाखाे भाविक येणार असल्याने स्थानकावरील तीन प्लॅटफाॅर्म अपुरे पडणार असल्याने रेल्वेने प्रवाशांच्या संख्येचा अंदाज घेऊन नवीन चाैथा प्लॅटफाॅर्म उभारण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक तयार असल्याने सिन्नर फाटा बाजूकडील जागेचा वापर करुन तेथे प्लॅटफाॅर्मची उभारणी करण्यात आली.

दाेन्हीपूल जाेडले जाणार
जुन्यापादचारी पुलालगतच नवीन पुलाची उभारणी केली आहे. दाेन्ही पूल एकमेकांना जाेडणार असून, प्लॅटफाॅर्मवर उतरण्याची व्यवस्था केली जाणार आहे. नवीन पुलाला नाशिकराेडच्या बाजूकडे वृद्ध अपंग प्रवाशांच्या साेयीसाठी रॅम्पची व्यवस्था असणार आहे.

शेड टप्प्याटप्प्याने
नव्यानेउभारण्यात येत असलेल्या चाैथ्या प्लॅटफाॅर्मवर आर्थिक अडचणीमुळे संपूर्ण शेड असणार नाही. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० प्रवासी बसू शकतील, असे १० शेड उभारण्यात येणार आहे. आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्लॅटफाॅर्मवर शेड उभारले जाणार आहेत.

पुलाला स्वयंचलित जिना लिफ्ट
अलाहाबादरेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुमारे ५५ मीटर लांबीचा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. सिंहस्थानंतर प्लॅटफाॅर्म ते साठी स्वयंचलित जिना तर चाैथ्याला लिफ्ट बसविण्यात येईल.

..असे आहेत प्लॅटफाॅर्म
रेल्वेस्थानकावर चार प्लॅटफाॅर्म आहे. प्लॅटफाॅर्म एक ४९० मीटर लांबीचा असून, सर्वात छाेटा आहे. प्लॅटफाॅर्म दाेन ६०३ मीटर लांबीचा आहे. प्लॅटफाॅर्म तीन सर्वात माेठा ६३० लंाबीचा असून, नव्याने तयार हाेत असलेला चाैथा प्लॅटफाॅर्म ६१० मीटर लांबीचा आहे.

२८ बाेगींची गाडी थांबू शकेल
लांबपल्ल्याच्या गाड्यांना २४ ते २६ बाेगी असतात. त्यासाठी किमान ६०० मीटर लांबीच्या प्लॅटफाॅर्मची गरज असते. नाशिकराेडला चारपैकी तीन प्लॅटफाॅर्मची लांबी ६०३ ते ६३० मीटर लांब असल्याने, दाेन ते चार नंबरच्या प्लॅटफाॅर्मवर २६ बाेग्या पार्सलच्या दाेन अशा २८ बाेग्यांची गाडी उभी राहू शकेल, या विचाराने नवीन प्लॅटफाॅर्मची उभारणी करण्यात येत आहे.