आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे पोलीसच्या मदतीने वाचले प्रवाशाचे प्राण, नाशिकरोड स्‍टेनशनवरील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - नाशिकरोड रेल्वे स्थानकावर गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करीत असताना एका प्रवाशाला हृदय विकाराचा झटका आला. यावेळी रेल्वे पोलिसांनी तत्पर मदत केल्याने या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत.  
 
जळगाव ते नाशिकरोडदरम्यान प्रवास करीत असताना संतोष काळूराम भंडारे (वय 38) हे त्यांच्या पत्नीसोबत नाशिकरोडला येत होते. नाशिकरोड स्थानकात उतरत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला. यावेळी रेल्वे पोलीस निरीक्षक नितीन पवार, रेल्वे सुरक्षा बलाचे उप पोलीस निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी त्वरीत मदत करीत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाने दिली आहे. पोलिसांच्‍या या तत्‍परतेमुळे त्यांचे प्राण वाचले.  पोलीसांचे हे रूप पाहून प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...