नाशिकरोड- रेल्वेच्या अनारक्षितसह आरक्षित तिकिटांच्या विक्रीचे खासगीकरण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिकृत तिकीट एजंटना स्थानकाच्या परिसरात ह्ययात्री तिकीट सुविधा केंद्रह्ण सुरू करण्यास अनुमती देण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन आहे. स्थानकामधील नियमित तिकीट खिडक्यांप्रमाणेच खासगी तिकीट खिडक्यांवर सर्वप्रकारची आरक्षित व अनारक्षित तिकीट विक्री होणार .
सध्या रेल्वेची तिकिटे रेल्वे स्थानकावरील अधिकृत खिडक्यांवर मिळतात व रेल्वेच्या कॉम्युटराईज्ड पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिमवरून (पीआरएस) रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवर आरक्षित तिकिटे मिळतात. याखेरीज, अधिकृत ट्रॅव्हल एजंटना फक्त इ-ितकिटे विकण्याचे परवाने आहेत. प्रवाशांना तिकिटे काढण्याची सुविधा अधिक चांगली व सुलभतेने मिळण्यासाठी आरक्षित व अनारक्षित ितकीट विक्रीत खासगी क्षेत्राच्या सहभागामुळे खासगी व्यक्तींकडून यात्री तिकीट सुविधा केंद्र चालविले जातील. स्थानकाच्या बाहेर जागा आणि सुयोग्य सोयीसुविधा असणारे एजंट यासाठी पात्र ठरतील. खासगी यात्री सुविधा केंद्रांवर रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस केंद्राच्या धर्तीवर चार टर्मिनल सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी पीआरएस खिडक्यांनंतर तासाने ती सुरू होतील. खासगी खिडक्यांवर सर्वसाधारण आरक्षण सकाळी ९, तर तत्काळ तिकिटांचे आरक्षण ११ वाजता सुरू होईल.
घोटाळ्याची शक्यता
रेल्वेच्या खासगी तिकीट आरक्षण केंद्रामुळे प्रवाशांना तासन्तास रांगेत ताटकाळत उभे राहावे लागणार नसले, तरी आर्थिक फटका मात्र नक्कीच बसणार आहे. प्रवाशाला एकापेक्षा अधिक आरक्षण मिळणार असल्याने घोटाळ्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. यावर प्रशासन, व्हिजिलन्सचे नियंत्रण नसेल. आऊटसोर्सिंगमुळे कर्मचाऱ्यांवरही अन्याय होण्याची शक्यता आहे.विवेक मायालू, अध्यक्ष, रेल्वे कामगार सेना