आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेचा भोंगळ कारभार; पदभरतीची जाहिरात 2010मध्ये, परीक्षा 2013ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रेल्वेच्या मुंबई येथील रेल्वे भरती बोर्डाने एप्रिल 2010 मध्ये कर्मशियल क्लार्क, तिकीट एक्झामिनर, तिकीट कलेक्टर या पदासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्याची परीक्षा तब्बल तीन वर्षांनी म्हणजे सप्टेंबर 2013 मध्ये घेण्यात येत आहे. यातूनच रेल्वेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

रेल्वेच्या मुंबई येथील रेल्वे भरती बोर्डांने एप्रिल 2010 मध्ये कर्मशियल क्लार्क, तिकीट एक्झामिनर, तिकीट कलेक्टर या पदासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. प्रत्येक पदासाठी 100 आणि 200 रुपयांचा डीडी द्यायचा होता. आता ऑगस्ट अखेरीला लेखी परीक्षेचे अचानक हॉल तिकीट आले असून ही परीक्षा 1 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 10 वाजता विविध केंद्रावर परीक्षा होणार आहे. अभ्यास कसा व कधी करावा असा प्रश्न परीक्षार्थींपुढे आहे.

वयोमर्यादेचा विचारच नाही
ज्या मुलांची वयाची र्मयादा संपत आली असेल आणि त्यांनी अर्ज केला असेल तर अशा घोळामुळे त्यांना तांत्रिकदृष्ट्याही अडचणीचे होणार आहे. -देवीदास आहेर, अर्जदार

दखल घेतली जाईल
रेल्वे भरती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल. तसेच भविष्यात तरुणांना नोकरी मिळण्याबाबत गैरसोय होऊ याबाबत देखल घेऊ.
- संतोष मंडलेचा, सदस्य रेल्वे सल्लागार समिती