आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Reservation Full, No Ticket Coming 20 Days

रेल्वे आरक्षण फुल्ल,आगामी 20 दिवसांचे मिळणार नाही तिकीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - मध्यरेल्वेने राजधानी दिल्लीला जाण्यासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर आणि नंतर नियमित केलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन अतिजलद वातानुकूलित गाडीला अनपेक्षितपणे प्रवाशांचा प्रतिसाद वाढला असून, आगामी 20 दिवसांपर्यंतचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, तात्काळ तिकिटासाठी प्रवशांची गर्दी वाढली आहे.
दिल्लीसाठी नियमित सुरू झालेल्या एलटीटी-निजामुद्दीन गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत नसल्याने, गाडीचे भवितव्य अधांतरी सापडले होते. गाडी बंद होते की काय, असे वाटत असताना मध्य रेल्वेने गाडी नियमित करताच प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. आगामी 20 पेक्षा अधिक दिवसांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला सर्वाधिक पसंती देण्यात येत असल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्टय़ा लागल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दिल्ली, बिहार, अलाहाबाद, नागपूरकडे जाणार्‍या गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.
तात्काळसाठी गर्दी
आरक्षण पूर्ण झाल्याने प्रवाशांना तात्काळ तिकीट हा एकमेव पर्याय असल्याने सकाळपासून तात्काळ तिकीट खरेदीसाठी प्रवासी रांग लावून बसलेले असतात. तिकीट मिळावे म्हणून रात्रीपासून गर्दी असते. तास न् तास रांगेत उभे राहून देखील अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. एजंट, दलालांनी संधीचा फायदा उठवत प्रवाशांची लूटमार सुरू केली आहे.
तिकीट मिळत नाही
रात्रीपासून रांगेत उभे राहूनही तिकीट मिळत नाही. एजंट, दलाल मोठी रक्कम वसूल करीत आहेत. प्रशासन,रेल्वे पोलिस मात्र दुर्लक्ष करतात. सुहास पळशीकर, प्रवासी