आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यालय मंजुरीनंतरच रेल्वे आराखडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- सिंहस्थासाठी रेल्वेने नाशिकरोड, देवळाली कॅम्प, ओढा या स्थानकांसह मालधक्क्यावर नियोजन केले असून, नियोजित, अतिरिक्त, तसेच थांबा नसलेल्या गाड्यांना स्थानकावर शाहीस्नानाचे तीन दिवस थांबा देण्याबाबतचा सविस्तर आराखडा मुख्यालयाला सादर करण्यात आला आहे. मात्र, मुख्यालयाच्या मंजुरीशिवाय आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर करणे शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले.
प्रशासनातर्फे सांगण्यात आले की, नवीन गाड्या इटारसी, अलाहाबाद, दिल्ली,औरंगाबाद, पाटणा, नांदेड येथून सोडण्याचा नाशिकरोड, देवळाली कॅम्प, ओढा मालधक्का यापैकी एका स्थानकावर थांबवून सोडण्याबाबतचा आराखड्यात समावेश आहे. नाशिकरोडला चौथा प्लॅटफॉर्म बांधण्यात येत असून, त्याचा वापर सिंहस्थाच्या गाड्यांसाठी करण्याच्या सूचनांचाही त्यात समावेश आहे. आराखडा मुख्यालयाला यापूर्वीच सादर केला आहे. मात्र, त्यास मंजुरी मिळालेली नाही. आराखडा मंजुरीचे अधिकार विभागीय स्तरावर नसल्याने तो मंजुरीशिवाय जिल्हा प्रशासनाला सादर करणे शक्य नाही.
नवीन गाड्या, थांबा नसलेल्या गाड्यांना थांबा, इतर विभागातून गाड्यांची मागणी, नवीन कोच तसेच गाड्यांच्या वेळापत्रकाबाबतचा निर्णय मुख्यालयात होत नाही. त्यासाठी रेल्वे बोर्डाची मंजुरी आवश्यक आहे. दोन्‍ही ठिकाणी आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला सादर केला जाईल.

चौथा प्लॅटफॉर्म, उड्डाणपूल, पूर्व बाजूला प्रवेशद्वार, तिकीट विक्री केंद्र आदी कामे वेगाने सुरू असून, मार्चअखेर रेल्वे स्थानक सिंहस्थात नाशकात येणा-या देशभरातील भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज असेल, असा विश्वास प्रशासनातील वरिष्ठ अधिका-याने व्यक्त केला.
थांब्यांचा प्रस्ताव
नाशिकरोड स्थानकावरून धावणाऱ्या ज्ञानेश्वरी, गाेरखपूर, हबीबगंज, गाेदान, असाेनसाेल, कर्मभूमी, पुरी कामाख्या या अाठ लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबा नाही. या सर्व गाड्यांसह हावडा येथून सुटणाऱ्या दुरांताे एक्स्प्रेसला िसंहस्थात शाही स्नानाचे तीन दिवस नाशिकराेडला थांबा देण्याचा प्रस्ताव आहे.