आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अप्रशिक्षित गार्डच्या हाती रेल्वेची सुरक्षा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रेल्वेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे गार्डचे पद असते. भुसावळ विभागात 533 गार्ड असून, अन्य 40 पदे रिक्त आहेत. त्यांच्या जागी चतुर्थ श्रेणीच्या पॉइंटमन या कर्मचा-यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे रेल्वेची सुरक्षा सध्या अप्रशिक्षित गार्डच्या हाती आली आहे.
रेल्वेच्या सेप्टी, सिक्युरिटी आणि पंक्च्युअ‍ॅलिटी यासाठी खास गार्डचे पद असते. भुसावळ येथे गार्डना 45 दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये रेल्वेची सुरक्षितता ठेवणे, गाडीला वेळेवर चालविणे, रेल्वेच्या सर्व विभागांची माहिती ठेवणे, कोणत्या विभागामुळे गाडीला उशीर झाला, याची माहिती वरिष्ठांना कळविणे, कंट्युनिटी म्हणजे एअर प्रेशर निरंतरता तपासणे, गाडीमधील लोडिंग व अनलोडिंग तपासणे, गाडीतून एखादा प्रवासी पडला तर त्याचावर प्रथमोचार करणे, तसेच एखाद्या प्रवाशाने साखळी खेचून गाडी उभी केली तर त्याचे कारण शोधून किती वेळ वाया गेला याचा तपशील घेणे आदी कामे गार्डची असतात.
भुसावळ विभागात 40 गार्डची पदे रिक्त असल्याने या जागेवर पॉइंटमन कर्मचा-यांना ही सर्व कामे करावी लागतात. विशेष म्हणजे पॉइंटमनला आपले काम करून गार्ड म्हणून गाडीतून जावे लागते. त्यामुळे त्याला 24 तास ड्युटी करणे भाग पडते. अशा प्रकारे गार्डच्या जागेवर अप्रशिक्षित कर्मचारी काम करतात. दुसरीकडे या गार्डवर ताण पडतो. त्यामुळे एखादा अनर्थ घडला तर त्याला जबाबदार कोणाला धरायचे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही ठिकाणी फक्त चतुर्थ श्रेणीच्या कर्मचा-याला काम करावे लागते असे नाही तर काही स्टेशन मास्तरही आपले काम सोडून गार्डचे काम करतात. त्यामुळे सर्वात प्रथम रेल्वेत रिक्त असलेल्या या जागा भरणे गरजेचे आहे.