आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेसेवा विस्कळितच, पावसामुळे वेळा कोलमडल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड - राज्यात सर्वदूर सुरू असलेला पाऊस, विदर्भात पावसाने क्षतिग्रस्त झालेल्या लोहमार्गामुळे गेल्या तीन दिवसांपासून विस्कळित झालेली रेल्वेसेवा अजूनही पूर्वपदावर येण्याची चिन्हे नाहीत. मंगळवारी दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. काही गाड्या रद्द झाल्या, तर अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या. परिणामी, येथील रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मोठय़ा प्रमाणात खोळंबा झाला. याचा सर्वाधिक फटका गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे दर्शन घेऊन येथील स्थानकाहून आपापल्या राज्यांत परतणार्‍या प्रवाशांना बसला.

मुंबई- नागपूर तसेच कोल्हापूर, पुणे व नांदेड या रेल्वेमार्गांवर उशिराने धावणार्‍या प्रवासी रेल्वेगाड्यांची परिस्थिती अशी होती : 12144 सुलतानपूर- कुर्ला (अडीच तास), 12030 शालिमार- कुर्ला (साडेतीन तास), 12810 हावडा- मुंबई मेल (चार तास), 57515 दौंड- मनमाड- नांदेड (तीन तास), 28846 हातिया- पुणे (दोन तास), 11040 गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस (अडीच तास), 12150 पाटणा- पुणे सुपरफास्ट (दीड तास), 12138 मुंबई- नागपूर सेवाग्राम (साडेआठ तास).

रद्द झालेल्या गाड्या अशा
12105 मुंबई- गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, 11401 मुंबई- नागपूर व्हाया मनमाड नांदेड (नंदीग्राम). यामुळे मनमाड रेल्वे स्थानकातील सर्व एक ते सहा प्लॅटफॉर्म व विर्शामगृहास जत्रेचे स्वरूप आले होते. सर्वच ठिकाणचे प्रवासी अ़डकून पडल्याचे चित्र दिसत होते.