आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाव्या दिवशीही दाेन्ही बाजूच्या डझन रेल्वे रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - मध्यप्रदेशातील हरदा येथील दुर्घटनेनंतर ट्रॅक दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने साेमवारी सहाव्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येऊ शकली नाही. सहाव्या दिवशी अप-डाऊन दाेन्ही बाजूच्या दाेन डझन गाड्या रद्द करण्यात अाल्या. गेल्या पाच दिवसांप्रमाणेच बहुतेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात अाला.
मनमाड ते मुंबई धावणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पंचवटी, गाेदावरी, राज्यराणी, भुसावळ-पुणे या गाड्या मात्र सुरळीत सुरू अाहेत. ट्रक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी सध्या रद्द हाेणाऱ्या गाड्या, मार्गातील बदलामुळे प्रवाशांची गैरसाेय हाेत अाहे. मुंबई भुसावळपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना तासन््तास रेल्वे स्थानकावर पर्यायी गाड्यांची वाट बघावी लागत अाहे.

पश्चिम रेल्वेमार्गावरून गाड्या वळविण्यात अाल्याने प्रवाशांना मुंबईपर्यंत जाऊन गाडी पकडावी लागत असल्याने मानसिक त्रास हाेत अाहे. ज्यांना शक्य नाही, बदलेल्या मार्गावरून गाडीची व्यवस्था नसलेल्या प्रवाशांकडून तिकीट,अारक्षण रद्द करण्यासाठी तिकीट खिडकीवर गर्दी हाेत अाहे. नाशिकराेड स्थानकावरून दरराेज दाेन लाख रुपयांपर्यंतचा तिकिटाचा परतावा प्रवाशांना द्यावा लागत अाहे. रेल्वे गाड्याच धावत नसल्याने तिकीट, अारक्षण विक्रीवर माेठ्या प्रमाणात परिणाम जाणवत असून, गेल्या अाठवड्यापासून रेल्वेच्या महसुलात १५ लाखांनी घट झाली अाहे. रेल्वे रद्द होत असल्याने अनेक प्रवासी इतर वाहतूक सेवेकडे वळत आहेत. सेवा कधी पूर्ववत होईल, याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.