आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकरोड रेल्वेस्थानक पार्किंग हद्दीच्या वादात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील पार्किंग हटवण्याचा मुद्दा हद्दीच्या वादात अडकला आहे. या अनधिकृत पार्किंगकडे रेल्वे पोलिस व शहर वाहतूक पोलिस या दोघांपैकी कोणीच लक्ष देत नसल्याने येथे अनधिकृतपणे पार्किंग होते आणि परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
स्थानकाकडे जाताना व्हीआयपीसह इतर वाहनांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. चौकीपासूनचा हा रस्ता रेल्वेच्या हद्दीत असला तरी तेथे काही घडले तरी त्याची नोंद नाशिकरोड पोलिस ठाण्यात होते. रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी राहतात. पण शहर वाहतूक शाखेचे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच हा रस्ता सध्या अनधिकृत वाहनतळ झाला आहे. या रस्त्यावरील चार चाकी वाहनांचे पार्किंग हे पार्सल ऑफिससमोर तर आवारातील दुचाकी वाहनांचे पार्किंग हे देवी चौकात हलवले. तरी रस्ता मोकळा झाला नाही.
दंडात्मक कारवाई - स्थानकाच्या आवारात उभ्या राहणा-या वाहनांवर लोहमार्ग पोलिसाच्या वतीने दंडात्मक कारवाई तर शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहने जप्त करण्यात येते. त्यामुळे आवारात वाहने उभी राहत नाहीत. मात्र, प्रवेशद्वारावरील रस्त्यावरील जबाबदारी वाहतूक पोलिसांची असल्याने तेथे कारवाई करता येत नाही. - विश्वजीत जाधव, निरीक्षक, लोहमार्ग पोलिस ठाणे