आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्काळ तिकिटासाठी सुलभ नियम; अाेळखपत्र झेराॅक्सपासून सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - रेल्वेच्यातत्काळ तिकिटांसाठी अाेळखपत्राच्या झेराॅक्सच्या नियमात रेल्वे मंत्रालयाने बदल करण्याचा निर्णय घेतला असून, सप्टेंबरपासून या नवीन नियमांची देशभरात अंमलबजावणी हाेणार अाहे. यानुसार, प्रवाशांना तत्काळ तिकीट काढण्यासाठी फाेटाे अाेळखपत्राची झेराॅक्स देण्याची गरज नाही. तसेच, प्रवासादरम्यान तिकीट तपासणीसाने फाेटाे अाेळखपत्राची मागणी केल्यास रेल्वेने जाहीर केलेल्या १० फाेटाे अाेळखपत्रांपैकी काेणतेही एक अाेळखपत्र दाखवले तरी ते ग्राह्य धरले जाणार अाहे. यापूर्वी तिकीट काढताना ज्या अाेळखपत्राची झेराॅक्स दिली अाहे, तेच अाेळखपत्र तपासणीसाला दाखवावे लागत हाेते. तसे नसल्यास फुकट प्रवास म्हणून भाडे दंड भरावा लागत हाेता.
तत्काळ तिकीट सेवेच्या नियम बदलण्यात अाला असून, त्यानुसार रेल्वेच्या साॅफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे निर्देश देण्यात अाले अाहेत. प्रवाशांना याअाधीच्या कठाेर नियमामुळे हाेणारा त्रास लक्षात घेऊन रेल्वेने त्यात बदल केला अाहे. नवीन नियमामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी पुन्हा दलालांचा सुळसुळाट हाेण्याची शक्यता अाहे. सर्वसामान्य गरजवंतांना तत्काळ तिकीट सेवेचा लाभ मिळावा, यासाठी फाेटाे अाेळखपत्राचा नियम लागू केल्याने दलालांच्या संख्येत घट झाली हाेती. तत्काळ तिकिटासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांचे अाेळखपत्र बघून प्रवासी अाहे की दलाल, हे अाेळखून त्याला रांगेतून बाहेर काढणे रेल्वे अधिकाऱ्यांना शक्य हाेत हाेते. नवीन नियमामुळे प्रवासी काेण, दलालांचा पुन्हा सुळसुळाट हाेऊन तत्काळ तिकिटांचा काळाबाजार वाढणार असल्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली अाहे.
गरजवंतांचीपरवड : तत्काळतिकिटासाठी दलालांकडून रात्रीपासूनच त्यांची माणसे रांगेत उभी केली जातात. सकाळी खिडकी उघडल्यानंतर तिकिटे काढून घेतली जात असल्याने अाेळखपत्राचा नियम हाेता. त्यात बदल केल्याने दलालांना सुगीचे दिवस येतील.

निर्णयाचा फेरविचार करावा
^नवीननियमामुळे प्रवाशांचा झेराॅक्सचा खर्च वाचणार असून, त्रास कमी हाेणार असला तरी अनधिकृत दलालांचे फावणार अाहे. अारक्षित तिकिटांचा काळाबाजार वाढणार असल्याने या निर्णयाचा रेल्वे प्रशासनाने फेरविचार करावा.- विवेकमायालू, विभागीय अध्यक्ष, मनसे रेल कामगार सेना
बातम्या आणखी आहेत...