आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Ticket Availability Know On Railyatri App

रेल्वे तिकिटांच्या उपलब्धतेची माहिती रेलयात्री अॅपवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बहुतांश लोकांनी दिवाळीच्या सुट्यांचे नियोजन आतापासूनच करण्यास सुरुवात केली असून, बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण सुरू झाले आहे. आता तिकिटांचे आरक्षण केले तर प्रतीक्षा यादीतील तिकिटे निश्चित होतील का, असे एक ना अनेक प्रश्न पडले असतील तर अशा प्रवाशांसाठी ‘रेलयात्री’ या रेल्वेविषयक अॅपने एक उत्तम सुविधा दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून तिकीट काढण्याआधी प्रतीक्षा यादीतील तिकिटे निश्चित होतील का, याचा अंदाज प्रवाशांना घेता येणार आहे.

मागील काही दिवसांतील तिकिटांच्या मागणीच्या कलाचा अभ्यास करून त्यानुसार हे अनुमान बांधण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तिकीट आरक्षित केल्यानंतर अनेकदा प्रतीक्षा यादीतील तिकिटे हाती येतात. मात्र, प्रवासाच्या तारखेपर्यंत प्रतीक्षा यादीतील तिकिटे निश्चित होतील की नाही, याबाबत धाकधूक असते. मात्र, आता आरक्षण करण्याआधीच प्रवाशांना प्रवासाच्या तारखेपर्यंत आपले तिकीट निश्चित होणार की नाही, याची माहिती रेलयात्री अॅपवरून मिळणार आहे.