आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Ticket Cancellation Fare Increases Nashik

रेल्वे तिकीट रद्द करणे महागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - रेल्वे मंत्रालयाने 1 जुलैपासून तिकीट रद्द करण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतल्याने तिकीट रद्द करणे प्रवाशांना चांगलेच महागात पडणार आहे. त्यामुळे यापुढे तिकीट रद्द करण्यासाठी निर्धारित तारखेच्या 48 तासांआधीच निर्णय घ्यावा लागेल; अन्यथा 25 ते 50 टक्क्यांपर्यंत भुर्दंड सहन करावा लागेल.

रेल्वे तिकिटाचे केलेले आरक्षण 24 तास आधीच रद्द केल्यास प्रवाशांना जो परतावा मिळतो, त्यासाठी 1 जुलैपासून 48 तासांपूर्वीच निर्णय घ्यावा लागेल. तर प्रत्यक्ष जाऊन काढलेले तिकीट रद्द करण्यासाठीची मुदत सहा तासांवरून चार तास करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयामुळे 30 जूनच्या मध्यरात्रीपासून प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास तिकिटाच्या 25 टक्के अधिक रक्कम वजा केली जाणार आहे. तसेच, सहा ते दोन तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास तिकीट मूल्याच्या थेट 50 टक्के पैशावर पाणी सोडावे लागेल. गाडी गेल्यानंतर दोन तास अथवा त्यानंतर तिकीट रद्द केल्यास एकही पैसा हाती पडणार नाही. मात्र, कुटुंब किंवा गटाने आरक्षण केले असल्यास सहा तास किंवा गाडी सुटल्यानंतर दोन तासांपर्यंत रद्द केलेल्या तिकिटांवर अधिकाधिक परतावा मिळू शकेल.