आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik IRTC Planning To Chek Railway Tickets Till 31 May To Stop Black Booking

तिकिटांचा काळाबाजार रोखणार रेल्वेचे पथक, ३१ मेपर्यंत रोज तिकीट केंद्रात तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - रेल्वेच्या प्रवासासाठीच्या तत्काळ तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेने अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली असून, ३१ मेपर्यंत दररोज सकाळी वाजेपासून तिकीट केंद्रांवर हे पथक उपस्थित राहणार आहे.
तत्काळ आरक्षण तिकिटांचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना महिनाभरात उघडकीस आल्याने त्याची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली. एजंट तत्काळ तिकीट विक्री सुरू होताच जास्तीची तिकिटे काढून जादा दराने विक्री करतात. यामुळे गरजवंत प्रवासी तिकिटांपासून वंचित राहतात. रात्रीपासून रांगेत उभे राहूनही प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर रेल्वेने पथक नियुक्तीचा निर्णय घेतला.

शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने एप्रिल, मे या दोन महिन्यांत आरक्षण तत्काळ तिकिटांना सर्वाधिक मागणी असते. याचा फायदा उठवून एजंटांकडून सर्वसामान्यांची लूट होऊ नये म्हणून हे पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात वाणिज्य निरीक्षक, मुख्य आरक्षण पर्यवेक्षक, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, मुख्य पार्सल पर्यवेक्षक, मुख्य मालधक्का पर्यवेक्षकांचा समावेश आहे.
सोमवार ते रविवारपर्यंत तत्काळ तिकीट सुरू होण्यापूर्वी एक तास आधी सकाळी वाजेपासून हे पथक तिकिटांसाठी रांगेत उभे राहाणाऱ्यांचे अर्ज ओळखपत्राची तपासणी करेल. यात तफावत आढळल्यास त्या व्यक्तीला रांगेतून बाहेर काढण्यात येईल. रांगेतील व्यक्ती एजंट असल्यास त्याच्यावर कठोर कारवाईची शक्यता आहे.

एजंटांविरोधात मोहीम

पथकाला दररोज विविध स्थानकांवर थांबण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकरोड, नाशिक, देवळाली कॅम्पसह इतर स्थानकांवरील तिकीट केंद्रांचा यात समावेश आहे. प्रशासनाने रेल्वे स्थानकावरून एजंट हद्दपार करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य, गरजवंतांना तिकीट उपलब्ध होऊ शकणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.