आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयीन वेळेत आरक्षण खिडकी बंद, एजंटांना मात्र दिले गेले तिकीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - रेल्वेमंत्रालयाकडून तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी अनेक कठाेर निर्णय घेऊनदेखील परिस्थितीत कुठलाच बदल झालेला नाही. कामकाजाच्या वेळेत आरक्षण खिडकी बंद करण्याचा प्रकार रविवारी दुपारी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर घडला. रांगेतील प्रवाशांना नाकारून बंद खिडकीतून दलालांना मात्र आरक्षण दिले गेले.
कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे प्रवाशांना प्रत्यक्ष अनुभवास आले. स्थानकावर आरक्षणाच्या पाच खिडक्या असून, पहिल्या शिफ्टचे कामकाज दुपारी वाजता संपते. असे असताना कर्मचाऱ्यांनी दुपारी १.४० वाजता पाचही खिडक्यांवरील कामकाज बंद केले. खिडकीच्या तोंडावर बंदचा फलक लटकवून दिला. एक खिडकी बंद झाल्यामुळे इतरांनी प्रवाशांचा आरक्षणाचा हातातील फाॅर्म बाहेर देऊन टाकला कामाची वेळ संपल्याचे सांगितले. तेव्हा कमिान २० पेक्षा अधिक प्रवासी आरक्षण तत्काळ तिकिटासाठी रांगेत उभे होते. दुसरी शिफ्ट दुपारी वाजता सुरू होते. १५ मिनिटे उशिराने तिसऱ्या क्रमांकाच्या खिडकीवर कामकाज सुरू झाले, तर इतर चार खिडक्या बंदच राहिल्या.
दलालांनातिकीट :कामकाजाची वेळ संपल्याचे सांगून खिडकीवर बंदचा फलक लावला गेल्यानंतर आरक्षण कार्यालयाच्या आवारात उभ्या दलालांना मात्र आरक्षण, तात्काळ तिकीट दिले गेले.
देशातीलएकमेव खिडकी सुरू :रविवार सुटीचा दिवस आहे. देशातील सर्व स्थानकांवरील आरक्षण तिकीट खिडक्या बंद आहेत. नाशिकरोड स्थानकावरील सुरू असलेली आरक्षण खिडकी ही भारतातील एकमेव सुरू असलेली खिडकी आहे, असे सांगून या कर्मचाऱ्याने गरजू प्रवाशांशी उद्धटपणाचे वर्तन केले.
नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण खिडकीवर रविवारी लावलेले बंदचे फलक.
कर्मचाऱ्याची अरेरावी
एकमेवखिडकी सुरू झाल्याने प्रवाशांनी तिकिटांसाठी रांग लावली. या ठिकाणी असलेला कर्मचारी प्रवाशांशी उद्धट वर्तन करत होते. आरक्षण फॉर्मवरील गरज नसलेल्या किरकोळ अपूर्तता आढळून आल्यानंतर फॉर्म फेकून देत होता. कोणी काही प्रश्न विचारल्यावर प्रवाशाच्या वयाचा विचार करता उद्धटपणे उत्तर देत होता.