आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा रेल्वेगाड्या रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड- परप्रांतातजाणाऱ्या परप्रांतातून मुंबईला येणाऱ्या १२ रेल्वे रद्द झाल्या, तर गाडी अनिश्चित तर एक १८ तास विलंबाने धावत होती. मंगळवारी दुपारी मनमाड जंक्शन येथे असे चित्र होते. नेहमीच्या गाड्या रद्द करण्याचा सपाटा रेल्वे प्रशासनाने गेल्या आठ िदवसांपासून कायम ठेवला आहे.
मनमाड येथून सुटणाऱ्या मनमाड-कुर्ला राज्यराणी, मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस तसेच भुसावळकडून येणाऱ्या इतर गाड्या वेळेवर धावत असल्याने स्थानिक प्रवाशांना त्याचा फारसा फटका बसला नाही. जम्मूतावी-पुणे, मंगला एक्स्प्रेस, वास्को निजामुद्दीन- गोवा एक्स्प्रेस, हैदराबाद-अजमेर एक्स्प्रेस या गाड्या आठ िदवसांपासून रद्द आहेत. मंगळवारी मुंबई-वाराणसी महानगरी, पटणा-मुंबई सुपर एक्स्प्रेस, गोरखपूर-कुर्ला काशी एक्स्प्रेस, गुवाहाटी-कुर्ला साकेत एक्स्प्रेस, तुलसी एक्स्प्रेस, मुंबई-लखनौ पुष्पक एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या अाहेत.