आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य रेल्वेचे बदलले वेळापत्रक; गाड्यांच्या वेळांत किरकोळ बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- मध्य रेल्वेच्या यंदाच्या नवीन वेळापत्रकात गाड्यांच्या वेळात 5 ते 25 मिनिटांच्या बदलाबरोबरच दोन नवीन गाड्यांचा समावेश आहे. या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू झाली आहे.

रेल्वे मंत्रालयाने 30 जूनला नवीन वेळापत्रक जाहीर केले. पुणे-भुसावळ गाडीच्या वेळेत 15 मिनिटांचा बदल केल्याने गोदावरी एक्स्प्रेसपूर्वी पुणे गाडी येईल; मात्र पंचवटीच्या वेळेत कुठलाही बदल झालेला नाही.

गाड्यांच्या वेळांत किरकोळ बदल
मुंबईकडे धावणार्‍या (अप) गाड्यांमध्ये अमरावती-सीएसटी, कानपूर सुपरफास्ट, छप्रा-सीएसटी, रॅक्सोल-एलटीटी, पंजाब मेल, बनारस-एलटीटी, हावडा-एलटीटी, मंगला एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ, राजेंद्रनगर, राज्यराणी एक्स्प्रेस, महानगरी, गोदान, पुष्पक, भागलपूर, गोहात्ती, बरेली, गीतांजली, साकेत, तुलसी, फैजाबाद, तपोवन, लखनौ सुपरफास्ट, लष्कर, कामायनी, पवन व सुलतानपूर एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. तर, भुसावळकडे धावणार्‍या (डाउन) दादर-साईनगर, एलटीटी-विशाखापट्टणम, महानगरी, दादर-वाराणसी, मनमाड-गोदावरी, पुणे-भुसावळ एक्स्प्रेसच्या पूर्वीच्या वेळेत 5 ते 25 मिनिटांचा बदल केला आहे.

वेळापत्रकाची अंमलबजावणी
नवीन वेळापत्रकात सुचविलेल्या काही मिनिटांच्या बदलानुसार गाड्या धावण्यास सुरुवात झाली आहे. वेळापत्रक दोन दिवसांत फलकावर लावले जाणार आहे.
-एम. बी. सक्सेना, अधीक्षक, ना.रोड रेल्वेस्थानक

नवीन दोन गाड्या
मध्य रेल्वेने घोषित केलेल्या 12 पैकी नाशिक मार्गे एलटीटी - निजामाबाद व एलटीटी-अजनी या गाड्यांचा समावेश आहे.