आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशिंदजवळील रेल्वेमार्ग दुरुस्त, मुंबईकडील वाहतूक सुरळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - वाशिंदजवळ दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम बुधवारी रात्री पूर्ण झाले. त्यानंतर रात्री ९.३० वाजता मुंबईकडील दाेन्ही बाजूंकडील वाहतूक सुरळीत झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे मार्ग दुरुस्तीत अडचणी आल्याने काम २४ तासांहून अधिक काळ रेंगाळले. पंचवटी, गोदावरी, राज्यराणीसह इतर सर्व रेल्वे नियोजित वेळेनुसार धावतील. मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या बुधवारी दिवसभर बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवाशांना एसटी तसेच खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. लांब पल्ल्याच्या गाड्या मनमाड आणि जळगाव स्थानकातून पुणे गुजरातमार्गे वळविण्यात आल्या. गजबजलेल्या नाशिकरोड स्थानकावर शांतता होती. 
 
बुधवारी या गाड्या रद्द : तपोवन,जनशताब्दी, गीतांजली, वाराणसी, पुणे-भुसावळ, मुंबई पॅसेंजर, गोहाटी, विदर्भ, अमरावती, ज्ञानेश्वरी, निजामुद्दीन, सेवाग्राम, दुरांतो. 
यागाड्या जळगावहून गुजरातमार्गे वळविल्या मुंबईला : पुप्षक,गीतांजली, महानगरी, जनता, पवन, हावडा, पंजाब 
 
या गाड्या मनमाडहून वळविल्या मुंबईकडे : काशी,तुलसी, वाराणसी, अमृतसर, कृषिनगर, मंगला, दुरांतो, हावडा, कामायनी 
 
व्यावसायिकांवर परिणाम : रेल्वेबंद असल्याने नाशिकरोड स्थानकाबाहेर रिक्षा, टॅक्सी, हाॅटेल, बसेस, कॅन्टीनचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. रिक्षा व्यवसायातून प्रतिदिन चारशे ते पाचशे रुपये कमवितो, मात्र दोन दिवसांपासून पन्नास रुपयेदेखील व्यवसाय झाला नसल्याचे किशोर खडताळे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...