आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे वीज अडीच तास गायब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॅफ‍िक हताळताना पोलिस. - Divya Marathi
टॅफ‍िक हताळताना पोलिस.
नाशिकराेड - मान्सूनपूर्व तयारीचा दावा करणाऱ्या महावितरण कंपनीचा संततधार पावसामुळे पाेलखाेल झाला. रविवारी ‘महावितरण’च्या यंत्रणेत बिघाड झाल्याने नाशिक शहर मधील बहुतांश भागातील वीजपुरवठा अडीच तासांपेक्षा अधिक वेळ खंडित हाेता. नाशिकराेडच्या जेलराेड भागात पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास खंडित झालेला पुरवठा साेमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पूर्ववत झाला.

‘महावितरण’ने पावसाळ्यापूर्वी वीजतारांवरील झाडांच्या फांद्या ताेडलेल्या असताना, रविवारी संततधार पाऊस किरकाेळ वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या वीजतारांवर पडल्याने इन्सुलेटर तुटल्याने गंगापूर, सिडकाे, उपनगर, पंचवटी, पवननगर, पंचक, जेलराेड, मेरी, ठक्कर बाजार, सामनगाव परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. अडीच तासांपेक्षा अधिक काळानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर विजेचा लपंडाव सुरू हाेता.

संततधारेने ठिकठिकाणी इन्सुलेटर तुटल्याने गंगापूर, मेरी, सिडकाे या परिसरात सव्वा तास; भगूर, पंचवटी भागात दाेन तास; पवननगर, राणेनगर भागात अर्धा तास; पंचक, सामनगाव, जेलराेड या भागात दाेन तास; उपनगर, माेटवाणी, ठक्कर बाजार, म्हसरूळ, गायत्रीनगर या परिसरातील अर्धा ते सव्वा तासापर्यंत वीजपुरवठा खंडित हाेता. पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर सर्वच ठिकाणी विजेचा दाब कमी-जास्त झाल्यामुळे ग्राहकांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागला.

पहाटेखंडित झालेली वीज सकाळी पूर्ववत :रविवारी दिवसभर खंडित वीजपुरवठ्याचा सामना केलेल्या ग्राहकांना पहाटेच्या सुमारास महावितरणच्या तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास सारडा सर्कल, जेलराेड भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास पुरवठा पूर्ववत झाला. त्यानंतर तासाभरानंतर दाेन वेळा काही मिनिटे पुरवठा खंडित हाेऊन पूर्ववत झाला.

अाठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने रविवारपासून शहरात जाेरदार हजेरी लावली असून, साेमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती. शाळा सुटल्यानंतर घरी जाण्याच्या अाेढीने निघालेल्या या विद्यार्थिनींना सिग्नलवर जणू या पावसानेच अडविल्याचे दिसते.

मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
येत्या ४८ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता अाहे. दहा मिनिटांत मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला अतिवृष्टी म्हटले जाते. -डी. एस.घाटे, हवामानतज्ज्ञ

वृक्ष काेसळले
पावसामुळेगंगापूररोडला एचडीएफडी बँकेशेजारी, मखमलाबाद नाका, त्रिमूर्ती चौक येथे वृक्ष काेसळले. पावसाळ्यात धाेकेदायक ठरणाऱ्या नाशिकराेड विभागातील २१६ घरांना पालिकेने नाेटीस बजावली. यात रमाबाई अांबेडकरनगर ७४, देवळालीगावातील अण्णा भाऊ साठेनगर २४, सुंदरनगर, गवळीवाडा, वडारवाडी ४१, राेकडाेबावाडी २६, इतर ठिकाणच्या ५१ घरमालकांना नाेटीस बजावली. वालदेवी नदीकाठच्या घरमालकांना सावधानतेचा इशारा दिला.

संततधार पावसामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांवर परिणाम झाला अाहे. नाशिकराेडला दसक येथील गाेदावरी नदीवरील श्री संत जनार्दन स्वामी पुलाला विहितगाव येथील वालदेवी नदीवरील पुलाला समांतर पुलाचे तसेच अागरटाकळी येथे गाेदावरी नदीवर नवीन पुलाचे काम सुरू अाहे. रेल्वेस्थानकावर चाैथा प्लाॅटफाॅर्म, तिकीट केंद्र, रेल्वे पादचारी पूल ते सिन्नर फाटा चाैफुली रस्ता तसेच नाल्यावर स्लॅप टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू अाहे. दाेन दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे कामांचा वेग मंदावला अाहे.
बातम्या आणखी आहेत...