आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा, डाळिंबाला गारपिटीने झोडपले; मालेगाव, येवला, नांदगाव, सिन्नरला फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा राज्यात तडाखा सुरू असून, शनिवारी दुपारी जिल्ह्यातील मालेगाव, येवला, नांदगाव आणि सिन्नर तालुक्याला याचा फटका बसला. बिहार ते तेलंगणाच्या दरम्यान भिन्न चक्राकार स्थिती झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे येवल्यातील कांदा शेड कोसळले, तर कुठे वृक्ष उन्मळून पडले. नाशिक शहरात शनिवारी किमान तपमान २०.२ तर, कमाल ३५.० अंश सेल्सिअस होते. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली.
जिल्ह्यात गुरुवारपासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारी दुपारी मालेगावातील निमगाव, मेहुण, द्वारडी या गावांत गारपीट झाली. येवल्यातील बोकटे, अंदरसूल, येवला परिसरात कांद्याचे शेड पडले, तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. सिन्नरला सलग तीन दिवसांपासून बेमोसमी पावसाचा तडाखा बसत
कांदा, डाळिंबाला गारपिटीने झोडपले
असल्यानेउन्हाळी कांद्यासह भाजीपाला आणि डाळिंब पिकाला फटका बसत आहे. नांदगावमधील मनमाड, सावरगाव, बिरोळे, वेहळगाव, पळाशी, तळवाडे परिसरात गारपीट झाल्याने कांद्याचे आणि कापसाचे नुकसान झाले. तसेच वादळामुळे पन्नासहून अधिक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले. विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता.
हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
याआठवड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी चार ते आठ किलोमीटर राहील. तपमानात वाढ होऊन ते ३७-३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते.