आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये पाऊस; वीज पडून एक ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना रविवारी मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. दुपारी शहर व परिसरात वळवाच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यात भिजण्याचा बालगोपाळांनी मनमुराद आनंद लुटला.

चितेगाव येथे विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडला. यावेळी अंगावर वीज पडल्याने एक ऊसतोड कामगार ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाºयासह तर काही ठिकाणी हलक्या प्रमाणात सरी कोसळल्या. योगेश कड यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती. ऊसाची थप्पी रचत असलेले गोरख ठाकरे, राजू लोखंडे यांच्यावर वीज कोसळली. यात ठाकरे याचा जागीच मृत्यू झाला तर लोखंडे गंभीर जखमी झाला.

कोकणातही मुसळधार
मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या कोकण किनारपट्टीवरही रविवारी रात्री वळवाच्या जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही भागातील रेल्वे वाहतूकीचा वेग मंदावला होता. राज्यात 6 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. तत्पूर्वी आलेल्या या पावसाने नागरिकांमध्ये समाधान आहे.