आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या अाठवड्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काही पावसाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - झारखंड राज्यामध्ये समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर गोलाकार वाऱ्याची स्थिती असून, विदर्भापर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वेला ढगाळ हवामान निर्माण झाल्याने पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
त्यामुळे या आठवड्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता अाहे. तसेच, येत्या आठवड्यात ३० ते ३१ टक्के ढगाळ वातावरण राहणार आहे. रविवारी कमाल ३९.०१ अंश, तर किमान १९.०१ अंश सेल्सिअसची नोंद झाली.