आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेनकोट, छत्र्या ‘गरमच’ ; प्लास्टिकच्या किमतीतही यंदा झाली 20 ते 25 टक्क्यांनी वाढ

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने रेनकोट, छत्री, मोटारसायकल झाकण्याचे कव्हर आदी पावसाळी वस्तूंच्या खरेदीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. रेनकोटसाठी वापरण्यात येणार्‍या प्लास्टिकची किंमत 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्याने आधीच रेनकोट महाग झाले आहेत. त्यात पाऊस लांबल्याने रेनकोट खरेदीचेही प्रमाण कमी झाले होते.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने हजेरी लावल्याने दुकानांमध्ये रेनकोट खरेदीसाठी तुरळक गर्दी व्हायला लागली आहे. मात्र, तरीही दरवर्षीपेक्षा यंदा खरेदीत घट असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच विविध प्रकारचे रेनकोट 350 ते 750 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच छत्र्यांमध्येदेखील साधी छत्री, डबल फोल्डिंग, ट्रिपल फोल्डिंगची छत्री असे प्रकार आहेत. साधी छत्री 150 रुपयांपर्यंत मिळते, तर डबल फोल्डिंगची छत्री ही 300 रुपयांपासून ते 450 रुपयांपर्यंत मिळते. ट्रिपल फोल्डिंगची छत्रीदेखील 400 ते 500 रुपयांपर्यंत मिळते. एकीकडे रेनकोट आणि छत्र्यांच्या किमतीतील भरमसाठ वाढ, तर दुसरीकडे पावसाने मारलेली दडी यामुळे या वस्तूंच्या खरेदीला अजूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.