आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगलपर्वास प्रारंभ : गणरायाच्या शिरी; बरसल्या सरी ,भर पावसात मंडळांकडून दणक्यात मिरवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -पारंपरिकढोल-ताशांचा गजर... डीजेच्या तालावर थिरकणारे गणेशभक्त.. ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर... अशा जल्लाेषपूर्ण वातावरणात मांगल्याचं प्रतीक असलेल्या लाडक्या गणरायाचं शहरातील सर्वच सार्वजनिक मंडळांसह घरोघरी मंगलमय वातावरणात शुक्रवारी स्वागत करण्यात आलं. गणरायाच्या स्वागताला वरुणराजानेही जोरदार हजेरी लावल्याने गणेशभक्तांमध्ये अधिकच उत्साह संचारला होता. भर पावसात मंडळांनी दणक्यात मिरवणूक काढून लाडक्या बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या सार्वजनिक मंडळांकडून मंगलमूर्ती गणेशाची मुहूर्त साधत विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या स्वागताला वरुणराजाने जोरदार बरसात केल्याने एकीकडे भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते, तर दुसरीकडे पावसामुळे गणपती बाप्पाला घरी नेताना भाविकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्रही पाहावयास िमळाले.
गणरायाच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मंडपाची उभारणी, अाकर्षक देखावे सजावटीचे काम पूर्ण करत सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून दुपारी दीड वाजेपर्यंतचा मुहूर्त साधत विधिवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना केली. गणरायाच्या खरेदीसाठी गोल्फ क्लबलगतचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. दुपारी दीड वाजेपर्यंतचा मुहूर्त असल्याने सकाळी सात वाजेपासूनच मूर्ती खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. त्र्यंबकरोड परिसरातील गोल्फ क्लबचा परिसर, गंगापूररोड, डोंगरे वसतिगृह मैदान, मेनरोड, पंचवटी, नाशिकरोड, इंदिरानगर, सिडको सातपूर या परिसरातील गणेशमूर्ती साहित्याच्या बाजारपेठाही फुलल्या होत्या. गणरायाची स्थापना निर्विघ्न व्हावी, यासाठी शहर पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्र्यंबकरोडचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने भाविकांची गैरसोय झाली नाही.

चिमुकले भक्त अन‌् बाप्पांची टोपी
लाडक्याबाप्पाला आणण्यासाठी महिलांसह चिमुकल्यांनीही बाजारात गर्दी केली होती. लालबागच्या राजासह वेगवेगळ्या रूपांतील मनमोहक बाप्पांच्या मूर्तीचा शोध घेत लाडक्या बाप्पाची खरेदी केली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करत चिमुकल्यांनी भगव्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. गुलालाची उधळण करत बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मंत्राेच्चारात झाली मूर्ती प्रतिष्ठापना
श्रींचीप्रतिष्ठापना करण्यासाठी चौरंगाभोवती मखर, नारळ, आंब्याचे पानं, पाण्याने भरलेला तांबा, पंचपात्र, ताम्हण, समई, फळे प्रसादासाठी मोदक असे पूजा साहित्य रचत मंत्रोच्चारात श्रींची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
अन्उडाली तारांबळ
मंगलमूर्तीचीखरेदी करून घराकडे निघालेल्या भाविकांची वरुणराजाच्या जोरदार हजेरीने चांगलीच तारांबळ उडवली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस आल्याने कुठे छत्री तर कुठे प्लास्टिकचा आधार घेत बाप्पांच्या मूर्तीचे संरक्षण केले.
गणेशभक्तांच्याउत्साहाला उधाण
ढोल-ताशांच्यातालावर थिरकणाऱ्या गणेशभक्तांच्या उत्साहाला वरुणराजाने हजेरी लावत चांगलेच उधाण आणले. तरुण-तरुणींसह महिला लहानग्यांनीही गणरायाच्या स्वागताच्या मिरवणुकीत सहभागी होऊन लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले.