आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पावसाची रिपरिप, सायंकाळपर्यंत मि.मी. नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यासह शहरात दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मिटल्याने नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. रविवारी दिवसभर नाशिक शहर आणि परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. रविवारी शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

उत्तर-मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागावर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन ते सौराष्ट्र आणि बाजूच्या भागावर आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात येत्या दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. शहरात रविवारी दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरू होता. सायंकाळी पावणेसहा ते सव्वासहा वाजता मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. याचप्रमाणे सिडको, सातपूर येथेही पाऊस झाला. नाशिकरोडला संततधार सुरू होती.