आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- ‘बरसो रे मेघा मेघा’सारखे चित्रपट गीत, मेघ मल्हार रागातील ‘आयी बरखा बहार’ किंवा ‘बरसन लागी बदरिया’ अशा वैविध्यपूर्ण पावसाळी गीतांवर पाच वर्षांच्या लहानग्यांपासून ते अगदी चाळीशीपर्यंतच्या महिलांपर्यंत सार्यांनी ताल धरला. निमित्त होते, कलानंद कथक नृत्यसंस्थेतर्फे आयोजित पाऊसगाणी कार्यक्रमाचे.
येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये आयोजित सदर कार्यक्रमाचे उद्घाटन इनरव्हील क्लबच्या संस्थापक अध्यक्षा निवेदिता अथणी यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या इंदिरानगर, गोविंदनगर, संभाजीचौक, वाघ गुरुजी शाळा, अशोकस्तंभ व मेरी या सहा शाखांमधील तब्बल 180 विद्यार्थ्यांनी पावसाळी गीतांवर नृत्य सादर केले. ‘घनन घन गिर गिर आई बदरा’ या लगान चित्रपटातील गीतावर अगदी लहान मुलामुलींनी सादर केलेल्या नृत्यास रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ हे नाट्यगीत, ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा’ अशा सदाबहार गीतांवर सादर झालेल्या नृत्यांना रसिकांनी मनापासून दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरू संजीवनी कुलकर्णी, सुमुखी अथणी, वृषाली कोकाटे, माधवी चिटणीस, गीतांजली सोळंकी, पल्लवी वीरकर, तृषाली शुक्ल आदींनी पर्शिम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.