आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरली प्रतीक्षा, बरसल्या सरी नाशिककरांना अाली उभारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - सिडको,इंदिरानगर, अंबड, पाथर्डी, विल्होळी परिसरात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी नाले भरून वाहिले, तर रस्ते पाण्याने धुवून निघाले. सायंकाळी वातावरणातही गारवा निर्माण झाला हाेता. पवननगर, उत्तमनगर, विजयनगर, शिवाजी चौक, त्रिमूर्ती चौक भागात रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. मुख्य रस्त्यांवरून वाहनचालकांना पावसातून वाट काढावी लागली. सायंकाळी भरणाऱ्या भाजीबाजारावर पावसाचा परिणाम झाला.
शेतकरीराजासुखावला :बळीराजा पावसाच्या आगमनाने सुखावला आहे. विल्होळी, अंबड, पाथर्डी, पिंपळगाव, चुंचाळे परिसरात गहू, तांदूळ यासह अनेक मुख्य पिके शेतकरी पिकवतात. पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मशागतीला सुरुवात केली आहे.
नाशिक - अतिशय प्रतीक्षा असलेल्या पावसाचे अखेर मंगळवारी (िद. २१) शहरात अागमन झाले. शहरातील हवामान केंद्रात ७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नागरिकांनीही पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेत पावसाचे स्वागत केले. पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला अाहे. दरम्यान, या पावसामुळे शहर परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले हाेतेे. तसेच त्र्यंबकराेडवरील वेद मंदिर परिसरातील एक वृक्ष काेसळला.
चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाची प्रतीक्षा हाेतीच. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू झाला. पंधरा ते वीस मिनिटांनंतर पावसाचा जोर वाढला. सुरुवातीला नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प परिसरातून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पंचवटी, जुने नाशिक, महात्मानगर, सिडको, सातपूर, पाथर्डी फाटा, म्हसरुळ, काॅलेजरोड, गंगापूररोड या भागात मुसळधार पाऊस पडला.

पावसाचा पुढील अंदाज असा...
दिनांकवातावरण अंदाज
२२ जून ढगाळ हलका
२३ जून ढगाळ हलका
२४ जून ढगाळ हलका
२५ जून ढगाळ मध्यम
२६ जून ढगाळ हलका ते मध्यम
२७ जून ढगाळ हलका
बातम्या आणखी आहेत...