आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुप्रतीक्षेनंतर सुखद ‘वर्षा’व, दिवसभरात ५.६ मिलिमीटरची नाेंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने शनिवारी (दि. २) शहरात हजेरी लावल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक शहरवासीयांनी पावसात भिजण्याचा, तर काही युवकांनी फुटबाॅलसारखे खेळ खेळण्याचा आनंद लुटला. दिवसभरात झालेल्या ५.६ मिलिमीटर पावसाने सर्वांनाच दिलासा मिळाला.
जूनमध्ये एकदाच हजेरी लावलेल्या पर्जन्याने त्यानंतर दडी मारली होती. त्यातच अाठवड्यातून दाेनदा पाणीकपातीची चर्चा सुरू झाल्याने नागरिक चिंतित झाले हाेते. हवामान विभागाचे सर्व अंदाज खोटे ठरल्याने नाराजीही व्यक्त केली जात हाेती. शनिवारी पावसाचा कोणताही अंदाज नसताना दुपारी नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प, सिडको, सातपूर, पंचवटी, काॅलेजरोड, महात्मानगर, इंदिरानगर, उपनगर, द्वारका, नांदूर नाका, औरंगाबाद नाका, अमृतधाम परिसरात रिमझिम सुरू झाली. यामुळे शहरवासीय सुखावत असतानाच दहा मिनिटांत पाऊस बंदही झाला. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने शहरवासीयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.

उशिरा अालास तरी स्वागत तुझे रे पावसा अाभार तुझे की खेळताे, बरसलास तू दिवसा
बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने शनिवारी शहरात हजेरी लावली. यामुळे शहरवासीय अानंदले, तर काही युवकांनी पावसात चिंब भिजत फुटबाॅलसारखे खेळ खेळण्याचा आनंद मनमुराद लुटला.
बातम्या आणखी आहेत...