Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Rain In Lasalgaon And Nifad At Nashik District

गोदावरीला पूर; नाशिक जिल्ह्यात मुसळधार, लासलगाव, निफाडमध्ये पिकांचे मोठे नुकसान

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 17:14 PM IST

  • अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहने अशी पाण्यात बुडाली होती.
नाशिक/अहमदनगर- लासलगाव परिसराला मंगळवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतातून काढून ठेवलेल्या मका, सोयाबीन तसेच ऑक्टोबर छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या उन्हाळी कांद्याची लागवड सुरू आहे. या पावसाचा फटका या उन्हाळी कांद्याच्या रोपांनाही बसला आहे. सलग 3 तास मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडल्याने अहमदनगर जिल्ह्यात गोदावरीला पूर आला असून पुणतांब्यातील बंधारा पाण्याखाली गेला आहे. कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधारा फुटला आहे. पुण्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
लासलगाव परिसरात मंगळवारी 2 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाचे आगमन झाले. लासलगाव शहरात सुमारे 3 तास मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी उंच सखल भागात रस्त्यांवर पाणी साचले होते.

शेतकरी वर्गाची सध्या मका आणि सोयाबीन काढणीची तयारी सुरू आहे. अनेक शेतकर्ऱ्यांनी आपल्या शेतात मका आणि सोयाबीन काढून ठेवला आहे. मुसळधार पावसामुळे मका आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी कांद्याच्या लागवडीची तयारी अनेक शेतकऱ्यांनी केली होती मात्र या लागवडीवर या पावसाने पाणी फेरले गेले. काही दिवसांपूर्वीही लासलगाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने उन्हाळी कांद्याचे रोप वाया गेले होते आज त्याचा प्रत्यय पुन्हा आला.

निफाड तालुक्यात द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात असुन बहुतांश बागांच्या ऑक्टोबर छाटणी आवरलेली आहे माञ मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे अनेक द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended