आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये संततधार; सिडकोतील घरांत पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात दुसर्‍या दिवशीही संततधार पाऊस कोसळत राहिला. गुरुवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या काळात 17.6 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. सिडकोतील सावतानगर व श्रीरामनगरमध्ये बुधवारी रात्री घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले.

नाशिकरोडसह सिडको, सातपूर, सिडको, गंगापूररोड, पंचवटी, इंदिरानगर भागात जोरदार पाऊस पडला. सावतानगरमध्ये रस्त्याचे पाणी गटारीत न जाता उताराने थेट नागरिकांच्या घरात घुसत असून, र्शीरामनगरमध्ये रस्त्यावर साचणारे पाणी वाहनांमुळे बाजूच्या घरात जात आहे. संततधार पावसामुळे रस्त्यांवरील डांबर उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

चुकीचे नियोजन
मुख्य रस्त्यावरील सर्व पाणी घरात जाते. त्यामुळे रात्रभर घरातील पाणी काढावे लागते. महापालिके च्या चुकीच्या नियोजनामुळे विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
-नंदा सूर्यवंशी

तक्रारीकडे दुर्लक्ष
कित्येक वर्षांपासून घरासमोर पाणी साचत आहे. महापालिका अधिकारी, नगरसेवकांकडे तक्रार केली; मात्र काही उपयोग झाला नाही. पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुले आजारी आहेत.
-शोभा भांबेरे

थेट घरात पाणी
रस्त्यावरून वाहने गेल्यास थेट घरात पाणी येते. रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी जागाच नसल्याने हे पाणी साचते.
-सुनीता पवार