आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने झाेडपले, मग ट्रॅफिकमध्ये अडकले, पहिल्याच पाऊस परीक्षेत महापालिका फेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बुधवारी(दि. १४) दुपारी साडेचार ते साडेपाच या एका तासात काेसळलेल्या तडाखेबंद पावसामुळे शहरातील मुख्य रस्तेच नव्हे, तर पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असणारे महापालिका मुख्यालयही गुडघ्याएवढ्या पाण्याखाली गेले. मध्यवर्ती शहरातील सराफ बाजार, कापड बाजार, मेनराेड परिसराला तळी अाणि नाल्यांचेच स्वरूप अाले. पावसाच्या या जाेरदार माऱ्यातून सावरतात न् सावरतात ताेच ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसह हजाराे नाेकरदार-विद्यार्थ्यांना चाैक-सिग्नलवर झालेल्या वाहतूक काेंडीने घरापर्यंत पाेहाेचणे मुश्कील झाले. विशेषत: उंटवाडी सिग्नल, अायटीअाय पूल, एबीबी सर्कल येथे वाहतुकीचा बाेजवारा उडाला हाेता. 
 
सर्वात धक्कादायक म्हणजे, पालिका मुख्यालयासमाेरील रस्ताही पाण्याखाली गेला. तर महापाैरांच्या रामायण निवासस्थानासमाेरूनही पादचाऱ्यांसह वाहनचालकांना खाेल पाण्यातून वाट काढावी लागली. यंदा महापालिकेच्या भुयारी गटार विभागाने पावसाळापूर्व स्वच्छतेसाठी निविदा काढून स्वतंत्र काम दिल्याचा फटका संपूर्ण शहराला बसला. दरवर्षी पावसाळापूर्व कामांसाठी विभागनिहाय स्वच्छता केली जाते. त्यासाठी उन्हाळ्यातच निविदा काढून ठेकेदारांना कामे दिली जातात. हे ठेकेदार भुयारी गटार याेजना, तसेच रस्त्यावरील पाण्याचा निचरा चेंबर्सपर्यंत कसा हाेईल या पद्धतीने नियाेजन करतात. माेठे नाले-नद्यांची पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत जेसीबी, राेबाेद्वारे काही प्रमाणात सफाई हाेते. यंदा मात्र झाेपेत असलेल्या भुयारी गटार विभागाने पावसाळापूर्व स्वच्छतेसाठी निविदाच काढल्या नाही. महापालिका स्तरावर शक्य हाेईल तितकी सफाई केली; मात्र पालिकेत अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे छायाचित्रापुरतीच सफाई माेहीम पार पडली. त्याचा पर्दाफाश पहिल्यावहिल्या मुसळधार पावसाने केला. दुपारी साडेचार वाजता शहरात पाऊस सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच रस्ते पाण्याखाली गेले. पावसाचा जाेर असल्यामुळे भुयारी गटारीत पाणी सामावण्याएेवजी अाणखी जाेराने उफाळून वाहू लागले. त्यामुळे या गटारीचे चेंबर्सच व्यवस्थित साफ केले नसल्याचे स्पष्ट झाले. 

इफ्तारवरही झाला परिणाम : रमजान पर्व सुरू असल्याने उपवास सोडण्यासाठी जुने नाशिक परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने मांडण्यात आली आहेत. सायंकाळच्या वेळेस आलेल्या पावसाने सर्व दुकाने तातडीने बंद करण्यात आलेल्या इफ्तारवरही यांचा परिणाम झाला. परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना यामुळे मोठे अार्थिक नुकसान सहन करावे लागले. 

दुचाकीसोबत वाहून जाणाऱ्या दांपत्यास वाचवले 
पावसाला सुरुवात होताच उताराचा परिसर असल्याने सराफ बाजारातून मध्यवर्ती शहरातील पाणी वाहू लागले. रस्त्यावरून दोन ते अडीच फूट पाणी वाहत असल्याने दाेन-तीन मोटारसायकलही त्यात वाहून गेल्या. सराफ बाजारात एक दुचाकी वाहून जात असताना ती पकडण्यासाठी गेलेला चालकही त्यासोबत वाहू लागला आणि पतीला वाचविण्याचा प्रयत्न करणारी महिलाही या पुरात वाहून जाऊ लागली. परंतु, तत्काळ बघ्यांनी त्यांना पकडल्याने पुढील अनर्थ टळला. सराफ बाजारातील दुकानांत पाणी घुसले हाेते. रस्त्यापेक्षा एक ते दीड फूट उंचीवर पायऱ्या असलेल्या दुकानांतही पाणी गेल्याने दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले. सराफ बाजारातून पुढे भांडी बाजार, कापडपेठही पावसात बुडाली होती. 

मायको सर्कल परिसरात वाहतूक कोंडी 
मायकोसर्कल, वेदमंदिर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या मार्गावर ठिकठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने मायको सर्कल परिसर ते जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, वाहतूक कोंडी निर्माण होऊनही वाहतूक पोलिस उपस्थित नसल्याने काही वाहनधारकांनीच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. 

येथे पडली झाडे 
{जिल्हा न्यायालयाचे आवार 
{ राजीव गांधी भवन मुख्यालयाचा पश्चिम दरवाजा 
{ आयटीआय सिग्नलजवळ 
{ महात्मानगर गणपती मंदिरासमोर 
{ माउली लॉन्स, डीजीपीनगर 
{ कालिका पंपिंग दर्ग्याजवळ 
{ महात्मानगर येथील टायटन शोरूमजवळील 
 
पुढील स्लाइडवर वाचा सविस्तर बातमी आणि फोटो...
 
बातम्या आणखी आहेत...