आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात मुंबईही तुंबते, नाशिक तुंबले तर काय विशेष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शाळेच्या पहिल्या दिवसाची घंटा खणाणली अन‌् पाणावल्या डोळ्यांनी हुंदके देत चिमुरड्यांनी शाळा प्रवेश केला. यासाठी शाळांनीदेखील स्वागताची जय्यत तयारी केली हाेती. अनेक शाळांत विद्यार्थ्यांचे औक्षण, चॉकलेट्स-बिस्किट वाटप, पुस्तक वाटप तसेच वेगवेगळे गिफ्ट‌्स देऊन स्वागत करण्यात अाले, तर काही शाळांत वेगवेगळ्या खेळण्या कार्टून्सच्या प्रतिकृतींद्वारे नवागतांचे स्वागत झाले. या सर्व वातावरणात कुठे अश्रु, कुठे हसू, तर कुठे उत्साह दिसून येत हाेता. मात्र, त्याचबराेबर शिक्षक-पालकांची धावपळही बघायला मिळत हाेती. 
 
दाेनतासाच्या पावसाने शहर जलमय झाल्यानंतर पुराचे पाणी घरात घुसल्यामुळे लाखाे रुपयांची वित्तहानी झाल्यानंतर महापालिकेत मात्र निसर्गाचा कसा दाेष हाेता प्लास्टिकमुळे पावसाळी गटारी कशी तुंबल्या याबाबत जबाबदारीची टाेलवाटाेलवी करण्याची अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली. नाशिकच काय परंतू मुंबईतही इतका पाऊस झाला तर अापत्ती निवारणाची सत्वर यंत्रणा नाही. ‘मुंबईही तुंबते, नाशिक तंुबले तर काय विशेष?’ असा सवाल करत अधिकाऱ्यांनी अंग काढून घेण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे, महापाैर रंजना भानसी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी किरकाेळ धारेवर धरण्यापलीकडे काही केले तर नाहीच मात्र पत्रकारांनी प्रभागनिहाय स्वच्छतेचे ठेके कसे दिले अन्य प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापाैरांनी अधिकाऱ्यांची पाठराखण करण्यातच धन्यता मानली. बुधवारी दुपारी साडे चार ते सहा या कालावधीत मुसळधार पावसाने शहराला झाेडपून तर काढलेच मात्र पावसाळी गटार याेजनेतील भ्रष्टाचाराचाही पर्दाफाश केला. पावसाळी गटारीची कागदाेपत्रीच सफाई झाल्यामुळे पाणी तुंबून इतस्तताही गेले. सराफ बाजार, सिडकाे -सातपुर अनेक सखल भागात घरात पाणी घुसून अताेनात नुकसान झाले. या नुकसानीला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे अाराेप नागरिकांनी केले. या पार्श्वभूमीवर महापाैर भानसी यांच्यासह उपमहापाैर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी माेरूस्कर यांनी शहर अभियंता यु.बी पवार, भुयारी गटारचे गाैतम पगारे, अाराेग्यधिकारी डाॅ सुनील बुकाणे, वैद्यकीय अधिकारी डाॅ विजय डेकाटे यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी पाणी तुंबण्यास सर्वस्वी अतिपाऊस असल्याचे तर्कट मांडले. पावसाळापुर्व स्वच्छतेत काय केले यापेक्षा प्लाॅस्टीकमुळे गटारी तुंबल्याचे सांगत अाराेग्य विभागावर खापर फाेडण्याचे प्रयत्न झाले. 
एका तासात शहरात ९७ मि.मी पाऊस झाला पावसाळी गटारीतून २७ मि.मी इतकी वहनाची क्षमता असल्यामुळे पाणी तुंबल्याचा दावा यु.बी पवार यांनी केला. मुंबईत जास्तीजास्त ५० मि.मी पाणी वहनाची क्षमता असून इतका पाऊस काेठेही झाला तरी हेच हाेणार नाही असा दावा त्यांनी केला. त्याबराेबरच शहरात प्लाॅस्टीक माेंठ्या प्रमाणात पावसाळी गटारीजवळ पडले असून त्यामुळे गटारी तुंबल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पवार यांच्या दाव्याला महापाैरासह अधिकाऱ्यांनी मान्य करीत अाराेग्य विभागाला धारेवर धरीत स्वच्छतेचे अादेश दिले. 
भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये दिसली मतभिन्नता 
बैठकीतमाेरूस्कर, गिते पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पाटील यांनी अधिकारी फिरकलेच नाही नवीन अधिकाऱ्यांची माहिती कशी कळणार असा सवाल केला. माेरूस्कर यांनी देवी चाैकातील पावसाळी गटारच्या निकृष्ठ कामाचे उदाहरण देत पाणी तुंबणार नाही तर काय, असा सवाल केला. गिते यांनी मुंबई नाक्यालगतच्या भरावाची कैफियत मांडत, नाले सफाई व्यवस्थित झाल्याचा परिणाम असल्याचा अाराेप केला. महापाैरांनी मात्र प्रशासनाची पाठराखण करताना पावसाळ्यापुर्वी कामे झाली मात्र अतिपावसामुळे पाणी तुंबल्याचा अधिकाऱ्यांचा दावा मान्य केला. 

तुंबणारी ठिकाणे तेच ; अधिकारीही तेच 
शहर अभियंता यु. बी. पवार यांना पालिकेत दिर्घकाळ कामाचा अनुभव असून पावसाळी भुयारी गटार विभागातील कामाचाही त्यांना अनेक वर्षांचा अनुभव अाहे. महापालिका मुख्यालय, कॅनडा काॅर्नर, त्र्यंबकराेड, वेद मंदिर, जुने नाशिक, सराफ बाजार या सखल भागात पाऊस कितीही झाला तरी पाणी तुंबण्याचे प्रकार नवी नाही. त्यामुळे पाणी तुंबणारी ठिकाणेही नेहमीचेच अधिकारही तेच अशी प्रतिक्रीया व्यक्त हाेत अाहे. 

पावसाळी सफाईभाेवती संशयकल्लाेळ 
{सर्वसाधारणपणे महापालिकेत महत्त्वाचे ठेके देताना शहराच्यादृष्टीने एक किंवा सहा विभागाच्यादृष्टीने सहा ठेकेदारांची नियुक्ती केली जाते. ठेकेदारावर नियंत्रण ठेवण्यासाठी साेयीस्कर म्हणून ही दक्षता घेतली जाते. पावसाळी गटार स्वच्छतेत मात्र ठेक्यांची खिरापत वाटत ३१ ठेकेदार निवडले गेले. 

{३१ ठेकेदारांमध्ये पैशांचे विभाजन झाल्यामुळे प्रशासनाच्या अखत्यारीत विषय मंजूर झाला स्थायी समिती महासभेला बगल देत त्यांचा हस्तक्षेप टाळला गेला. 

{अधिक ठेकेदार असल्यामुळे कामाचे विविध भाग पडून दाेषी काेणाला ठरवायचे हा प्रश्न तर निर्माण झालाच मात्र इतके सुक्ष्म नियंत्रण ठेवणे शक्य नसल्यामुळे कामचलाऊ कामासाठी संधी निर्माण केल्याचा संशय अाहे. 

{कामाच्या सुक्ष्म नियाेजनासाठी प्रभागनिहाय ठेके दिल्याचे शहर अभियंत्याचे म्हणणे अाहे मात्र वादग्रस्त घंटागाडीबाबत प्रभागनिहाय ठेके का दिले गेले नाही. 

 
बातम्या आणखी आहेत...