आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्वसू व पुष्य नक्षत्राच्या पावसाने निसर्ग फुलला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - आरंभी रुसलेला पाऊस जुलै महिन्याच्या मध्यापासून प्रसन्न झाल्याने खरीप हंगामावरील चिंतेचे ढग दूर झाले आहेत. सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाला असला तरी पूर्व भागात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पुनर्वसू व पुष्य नक्षत्राचा कधी रिमझिम तर कधी संततधार पाऊस टंचाईचे संकट दूर करण्यास उपयुक्त ठरला. रविवारपासून झालेल्या आश्लेषा नक्षत्रातही रिमझिम सुरू असल्याने हाच पाऊस कायम राहिल्यास पाणीटंचाई ठोस स्वरूपात दूर होण्यास मदत होईल.

या पावसाने सिन्नरच्या पश्चिम भागात निसर्ग फुलला आहे. डोंगरांवरून उसळी घेणारे धबधबे, दुथडी भरून वाहणारे ओहोळ, नद्यांना वाहणारे पाणी याबरोबरच हिरव्यागार डोंगरांचा नजारा पर्यटकांना खुणावू लागला आहे. रविवारच्या सुटीचे औचित्य साधून तरुणांनी सिन्नरच्या पश्चिम भागात फिरून निसर्गाशी मैत्री करण्याचा केलेला प्रयत्न सर्वांच्या चित्तवृत्ती प्रसन्न करून गेला.

वावी मंडलात सर्वात कमी, तर पांढुर्लीत सर्वाधिक पाऊस
सिन्नर तालुक्यातल्या सात महसूल मंडलांपैकी वावी व शहा या मंडलांमध्ये पावसाचा रुसवा कायम आहे. या मंडलात अनुक्रमे 45.9 व 65.58 मि.मी. एवढा जेमतेम पाऊस झाला आहे. सिन्नर व देवपूर मंडलात प्रत्येकी 196 मि.मी., डुबरे 183, नांदूरश्ािंगोटे 121 तर पांढुर्लीत सर्वाधिक म्हणजे 241 मि.मी. पावसाची नोंद झाली. मात्र, तालुक्यातील एकूण पावसाची सरासरी 149 मि.मी. एवढीच पोहोचू शकली.