आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकसह जिल्ह्यात संततधार; इगतपुरीत २४ तासांत १४१ मिमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्याच्या बहुतांश भागात बरसणाऱ्या, परंतु नाशिक जिल्ह्यास मात्र प्रतीक्षा असलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात जाेर धरला. अनेक भागांमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार सुरू अाहे. रविवारी नाशकातील हवामान केंद्रात ६०.८ मिलिमीटर पर्जन्याची नोंद झाली. इगतपुरीत रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १४१, तर त्र्यंबकेश्वरमध्ये ३५ मिलिमीटर पाऊस पडला. या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, दारणा नदीला पूूर अाला अाहे.
पावसामुळे नाशिककरांवर अाेढावू पाहणारे अाठवड्यातून दाेन दिवस पाणीकपातीचे संकट काेसळणार नाही, असे संकेत मिळत अाहेत. जिल्ह्यात कुठेही सूर्यदर्शन झाल्याने अाता पाऊस उघडताच खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार अाहे.रविवार सुटीचा दिवस असल्याने चाकरमान्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी पावसाचा मनमुराद आनंद लुटला. शहरात पहाटे वाजेपासून सुरू झालेला पाऊस दिवसभर काेसळतच हाेता.

‘सतर्क’चा हाय अलर्ट
राज्यातील दरडींसंदर्भात शास्त्रीय अभ्यास मांडणाऱ्या ‘सतर्क’ संस्थेने संततधार पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा हाय अलर्ट दिला आहे. विशेषत: घाटरस्ते (माळशेज, खंडाळा, ताम्हिणी, कार्ला, माथेरान, अंबानळी, आंबा, फोंडा, आंबोली, मेढा, कशेडी) तसेच एक्र्स्प्रेस हायवेवर खेड, संगमेश्वर, कशेडी येथे दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
छायाचित्र: इगतपुरी तालुक्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या चोवीस तासांपासून कायम असलेल्या मुसळधारेमुळे दारणा नदीला प्रथमच आलेला पूर.
बातम्या आणखी आहेत...